Satej Patil vs Dhananjay Mahadik  esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : 'बंटीं'च्या बालेकिल्ल्यात 'मुन्नां'ची बुलेट सवारी; कोल्हापुरात राजकीय चर्चांना उधाण

महाडिक यांनी बुलेटवर मागे बसून शर्यत मार्गावर सवारी करून उपस्थितांना दाद दिली.

सकाळ डिजिटल टीम

कागलवाडी परिसरातील महाडिकप्रेमी यांच्या वतीने महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यती झाल्या.

कोल्हापूर : मोटारसायकलबरोबर म्हैस व रेडकू पळवण्याच्या शर्यतीच्या निमित्ताने राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावडा (Kasaba Bawada) येथील कागलवाडी परिसरात केलेली बुलेट सवारी चर्चेचा विषय ठरली.

खासदार महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून या स्पर्धा झाल्या. उलपे गल्ली, कागलवाडी परिसरातील महाडिकप्रेमी यांच्या वतीने महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यती झाल्या. झेंडा चौक ते जयभवानी गल्ली चौक या मार्गावर झालेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाडिक यांच्या हस्ते झाला. सायंकाळी महाडिक यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बुलेटवर मागे बसून शर्यत मार्गावर सवारी करून उपस्थितांना दाद दिली. त्यांची ही बुलेट सवारी मात्र चर्चेचा विषय ठरली. ‘राजाराम’ कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, विजय उलपे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पोवार आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

Gold And Silver: सेबी गोल्ड-सिल्व्हर ईटीएफ नियमांमध्ये सुधारणा करणार? गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार; नवा नियम काय?

USA vs NAM Controvarsy : नामिबियाच्या कॅप्टनने झेल टिपला, पण निर्णय नाबाद दिला गेला! No Ball नव्हता, तरीही नेमका काय झाला राडा?

वाहतूक कोंडीपासून दिलासा! महाराष्ट्रातील ३,३२० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजूरी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाहा मार्ग...

SCROLL FOR NEXT