Campaign To Remove Hydrofoil From Panchganga River Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

पंचगंगेतील जलपर्णी हटवण्यासाठी मोहिम

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात आलेली जलपर्णी हटविण्यास आजपासून प्रारंभ करण्यात आला. पै.अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखालील एक टीम सकाळपासूनच कार्यरत झाली आहे. पालिकेच्यावतीनेही ही मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला घाट परिसरातील जलपर्णी हटवण्यात आली आहे. उद्यापासून बोटीचा वापर केला जाणार आहे.

येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी वाहत आली आहे. त्यामुळे नदीघाट परिसरातील नदीपात्र जलपर्णीने व्यापले आहे. त्यामुळे पाणी प्रदूषित होवून त्याचा धोका जलचरांना होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा पुन्हा जलपर्णी काढण्याची मोहिम हाती घेतली आहे.

पै. अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखालील व्यंकोबा मैदान येथील पैलवानांची एक टीम आज सकाळपासूनच जलपर्णी काढण्याच्या कामात गुंतली आहे. दरवर्षी या कामात पै. अमृत भोसले यांचा पुढाकार असतो. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा अखंडीतपणे अशी मोहिम राबवून पंचगंगा नदीपात्र जलपर्णीमुक्त केले आहे. यंदाही त्यांनी स्वंयस्फूर्तीने या कामात झोकून दिले आहे. 

15 डंपर जलपर्णी 
पालिकेचीही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीने नदीघाट परिसरातील जलपर्णी हटवण्याचे काम सुरु केले आहे. सकाळच्या सत्रात सुमारे 15 डंपर जलपर्णी काढली होती. पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. घाटालगतचा भाग जलपर्णी मुक्त झाला आहे. आता नदीपात्रातील आतील भागातील जलपर्णी काढण्यासाठी उद्यापासून बोटीचा वापर केला जाणार आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT