cancel of 798 youth Maratha caste certificate in kolhapur
cancel of 798 youth Maratha caste certificate in kolhapur 
कोल्हापूर

मराठा आरक्षण; 55 हजार मराठा तरूण-तरूणींचा जीव टांगणीला 

सुनील पाटील

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुण-तरुणींसमोर अंधकार पसरला आहे. जिल्ह्यातील 55 हजार 713 तरुण-तरुणींनी शिक्षण, नोकरीसाठी घेतलेले दाखले निराधार झाल्याची भावना अवस्थ करत आहे. तर, जिल्ह्यातील 798 तरुण-तरुणींचे मराठा जातीचे दाखले रद्द करण्यात आले आहेत. यातच महाराष्ट्र शासनाने 12 हजार पोलीसांची भरती करण्याचे जाहीर करुन मराठा समाजातील तरुण-तरूणींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. आरक्षणाचा अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया थांबवली पाहिजे, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.

मराठा आरक्षण जाहीर झाल्यापासून विविध शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी म्हणून जिल्ह्यातील 56 हजार 511 तरुण-तरुणींनी मराठा जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 55 हजार713 अर्ज वाटप झाले आहे. उर्वरित 798 दाखले अजून प्रलंबित आहे. यातच मराठा आरक्षणाला तात्पूरती स्थगिती मिळाल्याने दाखले घेवून शिक्षण घेणारे आणि याच दाखल्यावर नोकरी मिळवलेल्या जिल्ह्यातील 56 हजार 511 मराठा समजातील तरुण-तरुणींचा जीव टांगणीला लागला आहे. याशिवाय, आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळताच जिल्ह्यातील प्रांतकार्यालयाककडून मंजूर केल्या जाणाऱ्या दाखल्यांना रिजिक्‍ट केले जात आहे. हे दाखल काढण्यासाठी गोर-गरीब तरुणांनी महाईसेवा केंद्रात शेकडो रुपये भरले आहेत. आता त्यांना दाखलेही मिळणार नाहीत आणि पैसेही मिळणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. 
 

मराठा जातीचे दाखले देण्याची सुरुवात झाल्यापासून आजअखेर पर्यंतची माहिती अशी : 

उपविभाग* मंजूरीसाठी आलेले अर्ज* एकूण वाटप झालेले दाखले* प्रलंबित व रद्द अर्ज 
राधानगरी-कागल* 11513* 11513* 0 
पन्हाळा* 13099* 12917* 182 
आजरा-भुदरगड* 11487* 11262* 225 
गडहिंग्लज* 11971* 11903* 68 
इचलकरंजी* 4565* 4386* 179 
करवीर* 3876* 3732* 144 
एकूण* 56511* 55713* 798 
 

 पोलीस भरती स्थगित करावी 
एकीकडे मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. दुसरीकडे पोलीस भरती होत आहे. यामुळे मराठा समाजातील तरुण-तरुणींवर अन्याय होणार आहे. त्यामुळे ही भरती स्थगित करावी. 
-खासदार संभाजीराजे छत्रपती. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT