CCTV in Shivaji Peth area
CCTV in Shivaji Peth area 
कोल्हापूर

शिवाजी पेठ परिसरात सीसीटीव्ही 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर  : शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी पेठ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली. शिवाजी तरूण मंडळातर्फे सकाळी शिवजन्मकाळाचा सोहळा झाला. नंतर झालेलय कार्यक्रमात जाधव यांनी घोषणा केली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते. उभा मारूती चौक येथे शिवाजी तरूण मंडळातर्फे भव्य व्यासपीठ उभारले गेले आहे. तीन दिवसापासून येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. 

यावेळी आमदार जाधव यांनी "शिवाजी पेठ जे ठरविते ते करून दाखविते. मी आज जे काही आहे, ते तुमच्यामुळेच, पेठेची सुरक्षितता अधिक अबाधित राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवू. 

डॉ. देशमुख यांनी शिवाजी तरूण मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संभाजी पाटील, मोहनराव शेळके, बबन कोराणे, सदाभाऊ शिर्के, सुरेश जरग आदी उपस्थित होते. 

उभा मारूती चौक सेल्फी पॉंईट 
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूठ पुतळा, व्यासपीठाची शिवकालीन सजावट यामुळे उभा मारूती चौक सेल्फी पॉंईट ठरला आहे. लहान मुलांना पुतळ्यासोबत छायाचित्र घेता यावे, यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. सकाळी लिटल वन्डर प्ले स्कूल शाळेची मिरवणूक येथे आली. शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रूपात सजवून रथातून त्यांना उभा मारूती चौक येथे आणले. हाती भगवे झेंडे घेतलेल्या शिक्षिका. "छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा यामुळे परिसर शिवयम झाला. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT