central government has banned the mobile game Pubg The decision is being welcomed by parents and youth alike 
कोल्हापूर

पबजी बंद झालं, मग आता पुढे काय..?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्र सरकारने पबजी या मोबाईल गेमवर बंदी घातली. या निर्णयाचे पालक, तरुणांमधूनही स्वागत होत आहे. मात्र, अशाच प्रकारचे अन्य खेळही आहेत. पबजी गेला तरी त्याची जागा घेणारा दुसरा खेळही येईल. मुलांना मैदानी खेळांकडे आकर्षित करणे, खेळातून कौशल्य विकास, शारीरिक सुदृढता वाढविणे, ही आव्हाने पालकांसमोर आहेत. त्यामुळे पबजी बंद झाला; पण पुढे काय, अशा प्रतिक्रिया उमटल्या.

पबजी खेळावर बंदी घालणे चांगला निर्णय आहे. या खेळामुळे तरुण, तरुणींच्या मानसिकतेवर परिणाम होत होता. अशा प्रकारचे अन्य खेळही आहेत. तरुण पिढी या खेळांकडे वळेल. मोबाईल गेममध्ये अडकलेल्या तरुणांना मैदानी खेळांचे आकर्षण वाटेल, यासाठी काही तरी करावे. 
- सतीश पोवार, पालक

पबजी हा खेळ  मानसिक आजार उत्पन्न करणारा होता. त्यावर बंदी घालणे योग्यच आहे. मात्र, सध्या मुलांचा कल इलेक्‍ट्रॉनिक्‍स गॅझेटकडे अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास करणारे भारतीय बनावटींचे मोबाईल गेम विकसित करावेत. यामुळे मुलांना मनोरंजनाबरोबरच बौद्धिक विकासाचे साधन उपलब्ध होईल. 
- अनिल दिंडे, पालक

पबजी बंद झाला तरी अशाच प्रकारे अनेक गेम उपलब्ध आहेत. त्यामुळे हा निर्णय जरी बरोबर असला तरी त्याचा फारसा उपयोग नाही. मुलांना आभासी जगात जगू न देता त्यांना वास्तवाशी भिडायला शिकवावे. यासाठी शालेय स्तरापासूनच त्यांच्यात मैदानी खेळाची आवड निर्माण केली पाहिजे. 
- धीरज पाटील, महाविद्यालयीन तरुण 

खेळ हा केवळ मनोरंजनासाठी नसतो. तर त्यातून व्यक्तिमत्त्व विकसित होते. खेळातून मनोरंजनाबरोबर व्यायाम होणे, शारीरिक क्षमतांचा विकास होणे आवश्‍यक असते. खेळातून मन आणि मनगट घट्ट झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून पाहिल्यास कोणताच मोबाईल गेम उपयोगी नाही. पबजीवर बंदीचा निर्णय योग्य आहे. 
- इंद्रजित मोळे, कुस्तीपटू

पबजी बंदी हा निर्णय चांगला आहे. पण, आभासी जगात गुंतलेल्या तरुणाईला वास्तव जगात आणण्यासाठी पुरेसा नाही. यासाठी आनंदाची संकल्पनाच तपासून पाहिली पाहिजे. कागदी पुस्तक वाचणे, मैदानात खेळ खेळणे यातील आनंद घेता आला पाहिजे. मोबाईल गेममध्ये हरायला लागल्यावर रिस्टार्टचा पर्याय असतो. वास्तवातील खेळात मात्र हरावेच लागते. यातून अपयश पचविण्याची मानसिकता तयार होते. 
- डॉ. अश्‍विन शहा, मानसोपचार तज्ज्ञ

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : वडिलांनी शेत विकून घर बांधायला ठेवले १४ लाख, १३ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये गमावले अन्... धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : कोकण रेल्वेचं नवं ॲप! प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार गाड्यांची माहिती

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

SCROLL FOR NEXT