The central government should understand the farmers; Shrimant Shahu Maharaj 
कोल्हापूर

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना  समजून घ्यावे ; श्रीमंत शाहू महाराज 

युवराज पाटील

कोल्हापूर  : थंडी, वाऱ्याला न जुमानता शेतकरी ज्या पद्धतीने दिल्लीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करत आहेत, ही बाब राज्यकर्त्यांसाठी नक्कीच भूषणावह नाही. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावयाचे असेल तर त्यांना रोजगार द्या, त्यांच्या जमिनी कशाला हव्यात. राजर्षी शाहू महाराजांचे कृषी विषयक धोरण समजून घ्यायचे असेल तर केंद्र सरकारने आधी शेतकऱ्यांना समजून घ्यायला हवे, अशा शब्दात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले. शाहू महाराज गुरुवार (ता. 7) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी छत्रपती शाहू महाराजारांचे कृषी धोरण आणि सद्यस्थितीत सुरू असलेले आंदोलन यावर भाष्य केले. 

ते म्हणाले, ""कोणतीही व्यक्ती त्रस्त झाल्याशिवाय रस्त्यावर उतरत नाही. कृषी विषयक धोरणात दोष असल्याशिवाय शेतकरी आंदोलन करत नाहीत. पंजाब हे कृषी उत्पादनाबाबत देशातील अग्रेसर राज्य आहे. तेथील शेतकरी आंदोलन करतात. त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. दुर्दैव असे की त्यांच्याशी कोणी संवाद साधायला तयार नाही. ज्यांनी जबाबदारी घ्यायला हवी ते मुलाखत अथवा पत्रकार परिषदेत घ्यायला तयार नाहीत. प्रश्‍नोत्तरातून मार्ग तरी निघाला असता. 


ते म्हणाले, ""शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी शेतीचा विचार हा सर्वार्थाने केला. राधानगरी धरणाच्या ठिकाणी केवळ इलेक्‍ट्रीसिटी उभारण्याचा प्रयत्न होता; पण महाराजांनी धरण आणि इलेक्‍ट्रीसिटी अशी उभारणी केली. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या; पण कृषी अभियांत्रिकीकरणाच्या दिशेने त्यांनी पाऊल टाकले. शेतीला पाणी देताना त्यातून रोजगार उपलब्ध कसा होईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी समृद्ध झाला तर राज्याची पर्यायाने देशाची समृद्धी वाढते यावर शाहू महाराजांचा विश्‍वास होता. 

शाहू महाराज म्हणाले... 
* कंत्राटी शेतीचा प्रयोगाचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. 
*कंत्राटी शेतीने शेतकऱ्यांची शेतीशी नाते तुटेल 
* शेतकऱ्यांना जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना रोजगार द्या 
* पाण्याचा वापर ज्या पद्धतीने होतो त्याप्रमाणे उत्पन्न नाही 
* पीक पॅटर्न बदलल्यास, रासायनिक खतांचा वापर कमी होईल 

तरुणांनी व्यायामावर भर द्यावा 
पंचाहत्तरीकडे वाटचाल करत असताना तरुणांनी व्यायामावर अधिक भर द्यावा. शरीर तंदुरुस्त असेल तरच मन तंदुरुस्त राहील, असे आवाहनही या वेळी श्रीमंत शाहू महाराज यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT