कोल्हापूर

गडहिंग्लज-चंदगड हायवेवर झालेल्या अपघातात पोस्टल कर्मचारी ठार

निष्काळजीपणे वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

सकाळ डिजिटल टीम

गडहिंग्लज : गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील (chandgad-gadhinglaj highway) महागावजवळच्या लाकूडवाडी घाटात दोन मोटारसायकलींची समोरसमोर झालेल्या जोराच्या (accident) गडहिंग्लज-चंदगड हायवेवर झालेल्या अपघातात पोस्टल कर्मचारी ठार धडकेत एक ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जुजेवास फास्कू डिसोझा (वय ५८, वाटंगी, ता. आजरा) असे मृताचे तर शशिकांत कुंभार (नेसरी, ता. गडहिंग्लज) व नसरुद्दीन गुलाब शेख अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी (२८) सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. (crimecase)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत डिसोझा व जखमी कुंभार दोघेही गडहिंग्लजच्या पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आहेत. डिसोझा रोज नोकरीनिमित्त वाटंगी-गडहिंग्लज-वाटंगी असा प्रवास करतात. सोमवारी सायंकाळी कार्यालयातील कामकाज आवरून डिसोझा व कुंभार दोघेही मोटरसायकलने (एमएच ०९ बीडी ६७२९) गावाकडे जात होते. लाकूडवाडी घाटात नेसरीहून गडहिंग्लजच्या दिशेने मोटारसायकल (एमएच ०९ एई ७८६२) ने भरधाव येणाऱ्या नसरुद्दीन शेखने डिसोझा यांच्या मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली. त्यात तिघेही गंभीर झाले. डिसोझा यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली होती. तिघांनाही दवाखान्यात आणण्यात आले. उपचार सुरु असतानाच डिसोझा यांचा मृत्यू झाला, तर कुंभार व शेखवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मृत डिसोझाचे भाऊ डॉ. आर. पी. डिसोझा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मोटारसायकल चालक नसरुद्दीन शेख याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळच होती सेवानिवृत्ती

मृत डिसोझा गावात पोस्टमन होते. त्यांना चार महिन्यांपूर्वीच बढती मिळाल्याने गडहिंग्लजच्या पोस्ट कार्यालयात त्यांची बदली झाली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी दीड वर्षाचा कालावधी शिल्लक होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने वाटंगीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Tour of England : भारतीय संघातून मोठी अपडेट्स; हार्दिक पांड्याची इंग्लंड दौऱ्यातून माघार, जसप्रीत बुमराह, विराट कोहली याचं काय?

कांबळे रडला नाही, नुसताच कन्हला; कविता व्हायरल, ठाकरेंची सभा गाजवणारा नितीन चंदनशिवे कोण?

Fifa World Cup 2026 : तोंडावर हात ठेवून बोलला, रेफरीने करेक्ट 'कार्यक्रम' केला; Miguel Almiron सोबत विचित्र घडलं... Video Viral

Telegram Ban नंतर ॲक्सेससाठी लोकांनी शोधल्या नव्या ट्रिक्स; रॉकेटच्या वेगाने वाढले VPN डाऊनलोड, 'या' पद्धतीने सुरुय गैरवापर

Latest Marathi Live Updates: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT