Chandgad-Goa Made Liquor Seized On Dodamarg Road Kolhapur Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चंदगड-दोडामार्ग मार्गावर गोवा बनावटीची दारू जप्त

सुनील कोंडुसकर

चंदगड : चंदगड- दोडामार्ग मार्गावर कोदाळी (ता. चंदगड) येथे पोलिसांनी कारवाई करून 64 हजार 320 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. वाहन आणि दारू मिळून दोन लाख 64 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोदाळीनजीक लष्कर पॉईंट येथे काल सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. सर्व संशयित सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍यातील आहेत. 

गोव्याहून एका टॅक्‍स मधून (केए 36 एएम 3736) गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे आणली जात असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोदाळी येथे पोलिसांनी सापळा रचला. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही गाडी चंदगडच्या हद्दीत येताच पोलिसांनी रोखली. त्यांच्याकडे काजू फेणीसह विदेशी कंपनीची दारू सापडली.

संशयित दिलीप कृष्णा कांबळे (अंकलगी, जत, जि. सांगली), संतोष परसराम कांबळे, सचिन वंदना कांबळे, राजेंद्र परसराम कांबळे (तिघेही संक, जि. सांगली) व अजित कांबळे (आसंगी, जि. सांगली) या संशयीतांवर येथील पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार महेश बांबळे तपास करीत आहेत. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : रामनवमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा 23 वा उत्सव

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT