chandrakant patil
chandrakant patil 
कोल्हापूर

बाळासाहेब ठाकरेंची रणनिती योग्य; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यकारभाराला कोणतीही दिशा दिली नाही. त्यांना प्रश्‍न समाजावून घ्यावे असे वाटत नाही. कारण उद्धव ठाकरे यांचा जन्म पक्ष चालवण्यासाठी झाला आहे. राज्य चालवण्यासाठी नाही. अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली. मराठा आरक्षण प्रश्‍नाबद्दल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील वीज बिलाचा प्रश्‍न असो की मराठा आरक्षणाचा, त्यावर राज्य सरकारचे कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याचं ते म्हणाले. 

शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. पण त्यांनी सरकार बाहेर राहून सरकारवर अंकूश ठेवला. सरकारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्‍न सोडवले. नेता म्हणून त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे. समाजाचा अंकूश सरकारवर असला पाहीजे असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिकेवरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले की," वीज बिलामध्ये सवलत देण्याची तयारी मंत्री राऊत यांनी दाखवली. पण अजित पवार यांनी विरोध केला. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी सामोपचाराने मार्ग काढून सवलत देणे आवश्‍यक होते. पण त्यांनी यामध्ये लक्षच घातले नाही. मराठा आरक्षणाबद्दलही असेल असंही त्यांनी सांगितले. 

कोल्हापूरमधील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री हा मंत्रीमंडळाचा नेता असतो. जो सर्वांना एका दिशेने नेतो. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणतीही दिशा नाही. प्रश्‍न समाजावून घेण्याची त्यांची तयारी नाही. प्रशानावर त्यांची पकड नाही. मुळात उद्धव ठाकरे यांचा जन्म पक्ष चालवण्यासाठी झाला आहे. सरकार चालवण्यासाठी नाही. मुंबई महापालिकेची निवडणूकही त्यांनी कधी लढली नाही. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना काम केले नाही. त्यांना प्रशासन कसे चालते हे सुद्धा माहिती नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकार चालवतील असे काही जणांना वाटत होते. मात्र ते तरी सरकारकडे लक्ष देतात का असे वाटते.'
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT