Changes in Sarpanch reservation of 12 villages in Bhudargad, selection on Friday 
कोल्हापूर

भुदरगडला 12 गावांच्या सरपंच आरक्षणात बदल, शुक्रवारी निवड

धनाजी आरडे

गारगोटी, कोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यातील 60 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे सोमवारी फेरआरक्षण काढण्यात आले. यात 12 गावच्या सरपंचपदाच्या आरक्षणात बदल झाला. तर 29 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता.26) पहिली सभा बोलावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 
भुदरगड तालुक्‍यातील 97 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 27 जानेवारीला काढली होती. यानंतर राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष व फणसवाडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब जाधव यांनी फणसवाडी ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीबाबत हरकत घेतली होती. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बाळासाहेब जाधव यांची हरकत ग्राह्य मानून 60 ग्रामपंचायतीचे नव्याने आरक्षण काढण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज ही सोडत प्रक्रिया झाली. मौनी विद्यापीठातील महात्मा फुले सदनात आरक्षण सोडत झाली. यावेळी तहसीलदार अश्‍विनी अडसूळ प्रमुख उपस्थित होत्या. नायब तहसीलदार संदीप भूतल, राहुल पाटील, भरत पोळ, संतोष पाटील आदी उपस्थित होते. 

गावनिहाय आरक्षण असे 
सर्वसाधारण महिला : मडिलगे बुद्रुक, मुदाळ, कोंडोशी-दासेवाडी, अनफ बुद्रुक, तिरवडे-कुडतरवाडी, मिणचे बुद्रुक, फये, पडखंबे, देऊळवाडी, ममदापूर, नितवडे, नवरसवाडी, भालेकरवाडी-थड्याचीवाडी, सालपेवाडी, डेळे-चिवाळे, वासनोली, पारदेवाडी, न्हाव्याचीवाडी, अंतिवडे, म्हासरंग-उकीरभाटले, फणसवाडी, वेसर्डे, शेणगांव, नांदोली-करंबळी, पुष्पनगर, दोनवडे. लोटेवाडी, अनफ खुर्द, तांबाळे, देवर्डे, नाधवडे, शिवडाव. 

सर्वसाधारण पुरूष : गारगोटी, म्हसवे, टिक्केवाडी, सोनारवाडी, कोळवण-पाळेवाडी, पाळ्याचाहुडा, पंडिवरे, पाचर्डे, शिंदेवाडी, दोनवडे, पळशिवणे, बारवे, मोरेवाडी, हेदवगडे-गिरगाव, वेंगरूळ, पाटगाव, कारिवडे, बामणे, अंतुर्ली, पांगिरे, खेडगे-एरंडपे, चांदमवाडी, बेडीव, बसरेवाडी, नांगरगाव. दारवाड, फणसवाडी, आंबवणे, व्हनगुती, निष्णप- कुंभारवाडी. 

शुक्रवारी 29 ग्रामपंचायतींची सभा 
भुदरगड तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता.26) ग्रामपंचायतीची पहिली सभा बोलावण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. भुदरगड तालुक्‍यातील 45 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका जानेवारी 2020 मध्ये झाल्या. यातील 16 ग्रामपंचायती वगळता 29 ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेतील सरपंच व उपसरपंच निवडीचे जिल्हाधिकारी देसाई यांनी हे फेरआदेश दिले आहेत.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT