The Chicken Festival broke into the night in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात शिजले तब्बल 1 टन चिकन... पण पुढे काय झाले...?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोना व्हायरसची दहशत अन्‌ भीती घालविण्यासाठी आयोजित कोल्हापूर चिकन फेस्टिव्हलला हुल्लडबाज खवय्यांमुळे गालबोट लागले. शांततेत सुरू असलेला हा चिकन महोत्सव उत्तरार्धात काल रात्री साडेनऊनंतर विस्कळित झाला. खवय्ये अनियंत्रित झाल्याने खुर्च्यांची फेकाफेकी, पडदेही फाडण्यात आले. प्लेटांची फेकाफेक सुरू झाली. गोंधळ वाढल्याने अनेक जण जखमी झाले. यात महिलांचाही समावेश होता. काही स्त्रियांचे हातही फ्रॅक्‍चर झाले. ज्यात चिकन शिजविले जात होते, त्या भांड्यातच अनेक जण पडले. चिकन ६५ तळताना कढईतील तेलही अनेकांच्या अंगावर उडाल्याने जखमी होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. शाहूपुरी पोलिसांनी धाव घेऊन गर्दी नियंत्रणात आणली. यामुळे शेकडो किलो चिकन, ग्रेव्ही, बिर्याणी शिल्लक राहिली.  शिल्लक राहिलेले हे जेवण गोरगरिबांना दिले जाईल, असे संयोजकांनी सांगितले. 

फेस्टिव्हलने ५० रुपयांत कुपन दिले पण...

कोरोना व्हायरसशी दहशत जग अनुभवताना कोल्हापूरकरांनी  चक्क एक टन चिकन, ५०० किलो चिकन ६५ अन्‌ शाही चिकन बिर्याणी, चिकन ग्रेव्ही, चिकन रस्स्याचा फडशा पाडला. कोल्हापूर चिकन असोसिएशन, सांगली-सातारा-कोल्हापूर ट्रेडिंग असोसिएशने चिकन फेस्टिव्हलचे आयोजन आयर्विन मल्टिपर्पज हॉलमध्ये केले. तुफान गर्दी, चिकन अन्‌ बिर्याणीच्या घमघमाटाने परिसर दरवळून गेला होता. मात्र हुल्लडबाजीचे गालबोट लागल्याने अनेकांना नंतर आलेल्या खवय्यांना चिकन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. फेस्टिव्हलने ५० रुपयांत कुपन दिले होते. कुपनमध्ये शाही चिकन बिर्याणी, चिकन ग्रेव्ही, चिकन ६५ असे पदार्थ होते. ज्यांचे कुपन होते. ते लोक परत गेले. दरम्यान, ज्यांना कुपन्स दिली आहेत. त्याला ते ॲडव्हान्स पास मॅनेजमेंटतर्फे परत दिले जाईल, असे असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले. 

सातला नागरिकांना आत सोडले. एक रांग महिलांसाठी तर एक पुरुषांसाठी होते; मात्र आठ ते साडेआठच्या दरम्यान गर्दी वाढू लागली. नियंत्रण ठेवणे अशक्‍य होऊ लागले. अशातच बॅरिकेडवरुन काही लोक आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान, फेस्टिव्हलचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, श्री. बोरगे, अमर पाटील, डॉ. सुनील घोडके, वेगवेगळ्या कंपन्यांचे व्यवस्थापक, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर  आदींच्या हस्ते झाले. महापौर निलोफर आजरेकर यांनी भेट दिली. असोसिएशनचे समीर मुल्ला, जब्बार देसाई, फकरुद्दीन मुजावर, हनिफ थोडगे, इरफान मोमीन, शक्कुर मोमीन, अमीर मुल्ला आदी उपस्थित होते. रफिक मोमीन यांनी स्वागत केले. प्रविण यादव यांनी प्रास्ताविक केले.

धास्ती कमी करण्यासाठी...

कोरोनो व्हायरसमुळे चिकन विक्री करणाऱ्या चिकन शॉप्स्‌, कामगार, ट्रेडर्स, शेतकरी, व्यावसायिक, चिकन संबंधित कंपन्या आदींवर परिणाम झाला होता. यासाठी चिकन महोत्सवाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : जालन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशी पीक गेलं पाण्याखाली

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT