city traffic control branch now again launched a crackdown on drunk drivers 
कोल्हापूर

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची आता खैर नाही ; कोल्हापुरात वाहतूक पोलिसांनी कसली कंबर

राजेश मोरे

कोल्हापूर : दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची आता खैर नाही. कारण शहर वाहतूक नियंत्रण शाखेने आता पुन्हा मद्यपी वाहनचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन केले आहे.

 
कोरोनामुळे लॉकडाउन लागू केले. रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी असल्याने अपघाताचे प्रमाणही कमी होते, पण टप्प्याटप्प्याने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली. अपघाताचे प्रमाणही वाढू लागले. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाने अनिवार्य आहे. त्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून प्रबोधनासह कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. लॉकडाउन काळात बारही बंद होते. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांचेही प्रमाण कमी होते, पण सोमवारपासून (ता.5) बार सुरू होत आहे.

मद्यपी वाहनचालकांमुळे अपघातांचे धोके वाढतात. अशा चालकांना आवर घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाकडून चौकाचौकांत मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली जाईल. सायंकाळनंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल. मद्यपी वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत. 


मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई 

जानेवारी ते ऑगस्ट 2020 अखेर 

*एकूण कारवाई *दंडात्मक कारवाई *वसूल दंड *न्यायालयात दाखल खटले 
*247 38 24,800 209 

वर्ष कारवाई 
*2018 301 
*2019 444 


मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली आहे. त्या माध्यमातून शहरासह उपनगरातही ही कारवाई केली जाईल. 
- वसंत बाबर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT