कोल्हापूर

वेलींनी कोल्हापूर सजवण्याचा निर्धार; सतेज पाटलांच्या हस्ते 'या' मोहिमेला प्रारंभ

सकाळ वृत्तसेेवा

कोल्हापूर : विविध वेलींनी कोल्हापूर शहर(Kolhapur City) सजवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा निर्धार आज कोल्हापूरकरांनी केला. आपापल्या परिसरात वेली आणि झाडे लावून या उपक्रमात विविध संस्था, संघटनांसह वैयक्तिक कुटुंबांनीही स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवला. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळ कार्यालयासमोर प्रातिनिधीक वेली लावून या मोहिमेला प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व नियमांचे पालन करतच शहरातील विविध ठिकाणी मोहिमेत कोल्हापूरकर सहभागी झाले. (come-on-lets-plant-campaigning-start-in-kolhapur)

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविकात मोहिमेचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, ‘‘गेली दहा वर्षे ‘सकाळ'च्या माध्यमातून कोल्हापूरसह राज्यभरात झाडे लावून त्यांचे जतन व संवर्धनासाठी पुढाकार घेतला. मात्र, आता कमीत कमी जागेत अधिक हिरवे आच्छादन निर्माण करणेही गरजेचे असून त्यासाठी ‘चला, वेली लावूया‘ मोहिमेला प्रारंभ झाला असून लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.‘‘

कार्यक्रमाला ‘सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक महेश डाकरे, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT