Congress Archana Janvekar esakal
कोल्हापूर

Hatkanangale Nagar Panchayat : हातकणंगलेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अर्चना जानवेकर यांची बिनविरोध निवड

Congress Archana Janvekar : हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्यांनंतर ही पोटनिवडणूक लागली होती.

सकाळ डिजिटल टीम

थेट नगराध्यक्षपदी अरुण जानवेकर निवडून आले. मात्र, त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी अर्चना जानवेकर यांची बिनविरोध निवड झाली.

हातकणंगले : इतर चारही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने हातकणंगले नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या (Hatkanangale Nagar Panchayat) पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे अर्ज दाखल केलेल्या अर्चना जानवेकर (Archana Janvekar) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शक्ती कदम, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी काम पाहिले.

हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्यांनंतर ही पोटनिवडणूक लागली होती. यासाठी कॉँग्रेसकडून (Congress) अर्चना जानवेकर, भाजपकडून उज्‍ज्वला कांबळे, तर परशुराम गवळी, संदीप कांबळे आणि नंदा चौगुले यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. नेतेमंडळींना मान देत अखेरीस चारही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

निवड बिनविरोध करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सुरेशराव हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे नेते अरुणराव इंगवले, माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राजीव आवळे, राजू इंगवले, राहुल आवाडे, अजित काका पाटील, अजिंक्य इंगवले आदींनी प्रयत्न केले. दरम्यान, ११ तारखेला निवडणूक होणार होती. आता निवडणूक आयोगाकडे याबाबतची माहिती कळवली आहे. त्यांच्याकडून तसे निर्देश आल्यास ही निवडणूक बिनविरोध केल्याचे जाहीर होईल.

नगराध्यक्षपद प्रथमच बिनविरोध

थेट नगराध्यक्षपदी अरुण जानवेकर निवडून आले. मात्र, त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी अर्चना जानवेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे प्रथमच नगराध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT