containers carrying the crane got stuck in Manganur
containers carrying the crane got stuck in Manganur 
कोल्हापूर

क्रेन वाहून नेणारे दोन कंटेनर अडकले ; मांगनूर मध्ये वळणावरी घडली घटना

प्रकाश कोकीटकर

सेनापती कापशी - मांगनूर (ता.कागल) येथील वळणाच्या रस्त्यावर क्रेन वाहून नेणारे दोन कंटेनर अडकले. लांबी जास्त आणि इंग्रजी यु आकाराचे वळण यामुळे ही वाहने अडकली आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. गारगोटी ते गडहिंग्लज हा मुख्य मार्ग असूनही वळण काढण्याचा प्रश्न सुटला नसल्याने अशा घटना घडत आहेत. दुपारी तीन वाजले तरी हे कंटेनर काढता आले नाहीत. विशेष म्हणजे वाहने काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेनच या कंटेनर मध्ये आहेत. 

कंटेनरची लांबी जास्त आहे. अशी वाहने या मार्गावरून वाहतूक करणे सोपे नाही. रस्ता रुंदीकरण झाला मात्र मांगणूर येथील हे इंग्रजी यु आकाराचे वळण निघाले नाही. ग्रामस्थांची अनेक वर्षांची ही मागणी आहे. मात्र आश्वासना पलीकडे काही झाले नाही. आज सकाळी सात वाजता अडकलेल्या या कंटेनरसाठी ट्रॅक्टर, जेसीबीचा उपयोग केला जात होता मात्र यश मिळाले नाही.

यामुळे काही प्रमाणात लहान वाहने गावातील वळणे घेऊन प्रवास करत राहिली. वाहने अडकल्यानंतर त्यांना बाजूला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन या कंटेनरमध्ये आहेत. मात्र त्यांना खाली घेता येत नाही. अशी विचित्र स्थिती तयार झाली आहे. 

संपादन - मतीन शेख

kolhapur
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT