Corona in china good effect on the Indian foundry industry 
कोल्हापूर

चीन मधील कोरोनो व्हायरस मुळे भारताला झाला 'हा' फायदा....

अभिजित कुलकर्णी

कोल्हापूर - कोरोनामुळे भारतीय फाउंड्री उद्योगात आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे दळणवळण यंत्रणा पूर्णतः ठप्प राहिली. परिणामी, मोठी उत्पादन क्षमता असूनही कास्टिंगसाठी ऑर्डर देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय फाउंड्री उद्योगाला प्राधान्य देण्यास सुरवात केली. ही भारतीय फाउंड्री उद्योगासाठी संधी आहे. या संधीचा गुणवत्तेच्या जोरावर भारतीय उद्योगाला फायदा होईल.   

ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवासी व मालवाहू वाहनांचा प्रामुख्याने समावेश आहे. या वाहनांसाठी लागणाऱ्या विविध सुट्या भागांची निर्मिती करण्यात भारत हा अग्रेसर देश आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री असणाऱ्या येथील फाउंड्री उद्योगातून गुणवत्तापूर्ण कास्टिंग वेळेत मिळणार अशी खात्री अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आहे. 

कोरोना व्हायरसमुळे चीनमधील आयात निर्यात केंद्रे बंद

याच कारणामुळे भारतीय फाउंड्री उद्योगाने जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण केले आहे. पण, उत्पादनक्षमता आणि दर यामध्ये चीनने वर्चस्व ठेवलेले आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे चीनमधील आयात निर्यात केंद्रे बंद आहेत. त्यामुळे चीनकडून होणारा पुरवठा थांबला आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेतील स्थान टिकविण्यासाठी अनेक कंपन्यांनी भारतीय उद्योजकांची चर्चा सुरु केली आहे. त्यांना आवश्‍यक असणारे कास्टिंग आता भारताकडून पुरवठा होणार असल्याने भारतीय फाउंड्री उद्योगात निश्‍चितच आनंदाचे वातावरण आहे.
पण वाढलेली मागणी उत्पादनात परिवर्तित करताना येथील उद्योगांना अडचणी येऊ शकतात.

 कच्च्या मालाची आयात थांबल्याचा फायदा

उत्पादनासाठी अतिशय अल्प मात्रेत कास्टिंगमध्ये काही ॲडिटीव्ह घातल्या जातात. यामध्ये कार्बन, सिलिकॉन, ग्रॅफाइट, मॅग्नीज, निकेल, क्रोमियम, इनॉकुलंट यांचा समावेश आहे. लहान फाउंड्री उद्योगाला लागणारा मेल्टिंग कोकसुद्धा चायनावरून आयात केला जातो. हे सर्व घटक चीन व कोरियातून भारताला आयात करावे लागतात. चायनावरून होणाऱ्या कच्च्या मालाची आयात थांबल्याचा फायदा घेत डीलर्सनी आपल्याकडील कच्चामाल चढ्या भावाने विकण्यास सुरुवात केली आहे. मागणीप्रमाणे उत्पादन घेण्यासाठी सध्या अनेक फाउंड्री उद्योजक चढ्या भावाने हा माल खरेदी करीत आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT