corona effect on ssc exam result
corona effect on ssc exam result 
कोल्हापूर

दहावीचा निकाल वेळेत लागणार का ? 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - दहावीचे पेपर तपासल्यानंतर ते मॉडरेटरपर्यंत पोहचण्याविण्यापर्यंत येत असलेल्या अडचणी, लॉक डाऊनमुळे राज्य मंडळाचा पर्यवेक्षकांचा तुटलेला संपर्क या पार्श्‍वभूमीवर दहावीचा निकाल वेळेत लागेल का याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. अजूनही या परीक्षेचा एक पेपर होणे अद्याप बाकी आहे. 

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून सुमारे एक लाख 29 हजार इतके विद्यार्थी फेब्रुवारी-मार्च 2020च्या परीक्षेला सामोरे गेले आहेत. परीक्षा अंतिम टप्यात असताना राज्यभर कोरोनाचा प्रार्दुभाव सुरू झाला. दहावीचा शेवटचा पेपर रद्द झाला. संचारबंदीमुळे पर्यवेक्षकांना पेपर तपासणीसाठी शाळेपर्यंत येणे मुश्‍कील झाले. त्यावर उपाय म्हणून राज्य मंडळाने पर्यवेक्षक अर्थात शिक्षकांना घरीच पेपर तपासण्यास परवानगी दिली.

संबंधित विषय शिक्षकाने शाळेत जाऊन पेपर आणायचे आणि ते तपासून मॉडरेकडे जमा करायचे ही पद्धत, संचारबंदीमुळे पर्यवेक्षकांची अडवणूक झाल्याने त्यांना पेपर जमा करता आले नाहीत. पर्यवेक्षकांनी एकदा पेपर तपासल्यानंतर उलट तपासणीचे काम मॉडरेटरमार्फत होते. लॉक डाऊनमुळे रस्ते सुनासुन आहेत. पर्यवेक्षकांकडील पेपर तपासून तयार आहेत. काही पेपर मॉडरेटकपर्यंत पोहचले आहेत. दहावीचे असलेले विषय आणि उतरपत्रिकांची संख्या मोठी आहे. 
गुणांकन होऊन. संगणकाला त्याचे फिडींग होणे. राज्यातील आठही विभागीय मंडळाचा निकाल एकाचवेळी जाहीर होणे ही प्रक्रिया मोठी आहे. अजूनही दहावीचा एक पेपर बाकी आहे. लॉकडाऊन उठल्यानंतरच त्याची तारीख जाहीर होईल. ऐंशी गुणांची प्रश्‍नपत्रिका असल्यास एका पर्यवेक्षकाकडे सुमारे अडीचशे आणि चाळीस गुणांची प्रश्‍नपत्रिका असल्यास सुमारे दोनशे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी येतात. 

वेळापत्रक बदलणार 

बारावीची परीक्षा लॉकडाऊच्या आधी पूर्ण झाली होती. बारावीचा निकाल दरवषी मे अखेरीस लागतो. दहावीचा निकाल जूनच्या दूसऱ्या पंधरवड्यात लागतो. यावेळी हे वेळापत्रक बदलण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT