Corona infected doctor found in top kolhapur 
कोल्हापूर

टोपमध्ये आता 'ते' डाॅक्टरही कोरोना बाधित असल्याचे आले समोर...

युवराज पाटील

टोप - टोपमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या संपर्कात आलेल्या ५५ वर्षीय डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे अनेकांना धडकी भरली आहे. डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याबरोबर त्यांची क्रमवारी ठरवण्याचे आवाहन आरोग्य विभागासमोर आहे.

येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास कोरोनाची लागण झाल्याचे दहा जुलै रोजी स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले टोप येथील डॉक्टरसह ९ लोकांना क्वारंटाईन केले होते. त्यातील रुग्णाची पत्नी व मुलगा यांचा अहवाल निगेटिव्ह आला असताना सोमवारी रात्री आलेल्या अहवालात रूग्णाची तपासणी करणाऱ्या ५५ वर्षीय डॉक्टराचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने गावात खळबळ माजली आहे.

बाधित डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. डॉक्टरांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन, त्यांची क्रमवारी ठरवण्याचे आव्हान आता आरोग्य विभागापुढे आहे. आतापर्यत या डॉक्टरनी २० ते २२ लोकांची तपासणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या डॉक्टरांकडे ५ ते १० जुलै या कालावधीत उपचार घेणाऱ्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सरपंच रूपाली तावडे यांनी केले.

दरम्यान आज सकाळी ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या थेट संपर्कात आलेल्या आणखी १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे गावाला थोडा दिलासा मिळाला आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT