Corona positive patient found in radhanagri kolhapur 
कोल्हापूर

गुडाळ येथील एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा...

सुरेश साबळे

कसबा तारळे - मुळचे गुडाळ (ता.राधानगरी) येथील परंतु सध्या वास्तव्यास मुंबईत असलेल्या व गावाकडे येत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी रात्री उशिरा  स्पष्ट झाले.

याबाबतची माहिती अशी : नोकरी निमित्ताने मुंबईत स्थायिक असलेले एकजण पत्नी आणि 18 वर्षांच्या मुलासह खासगी ट्रॅव्हल्स बसने गावाकडे येत होते. गुरुवारी पहाटे मुदाळ तिठ्ठा येथे ते सर्वजण उतरले.गावी यायच्या तयारीत असताना त्यांचा माजी सरपंच अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी या सर्वांना राधानगरी येथील कोवीड केंद्रात दाखल होवून तेथील वैद्यकीय पथकाचे मार्गदर्शन घेवूनच गावी या असे सांगितले.श्री पाटील यांच्या सूचनेनुसार हे सर्वजण तेथून एका खासगी गाडीने थेट राधानगरी कोवीड केंद्रात तपासणीसाठी गेले.तेथे तिघांचेही स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी कोल्हापुरला पाठवण्यात आले व या सर्वांना केंद्रातच दाखल करून घेतले.

शुक्रवारी रात्री उशिरा या तिघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले.असे असले तरी गुडाळ गावाशी त्यांचा संपर्क आलेला नाही. मात्र पिरळ येथील एका खासगी वाहनातून ते सर्वजण मुदाळतिठ्ठा येथून राधानगरीत पोहचल्याचे समजल्याने संबंधित वाहनचालकाचा प्रशासनाने शोध सुरू केला आहे. दरम्यान, त्याचा व त्याच्या थेट संपर्कात आलेल्यांचाही स्वॅब तपासणीसाठी घेतला जाणार असल्याचे समजते.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT