कोल्हापूर

सीपीआरमधील 98 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

प्रतिनिधी

कोल्हापूर : सीपीआर कोरोना रुग्णालयात आज दिवसभर 246 व्यक्तींची तपासणी झाली. यात 20 नवीन रुग्ण दाखल झाले. नवे-जुने मिळून 184 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात 98 व्यक्तींचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. एकूण सात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 
सीपीआर कोरोना तपासणी व उपचार कक्षात दिवसभरात 246 व्यक्‍तींची तपासणी झाली. सर्व व्यक्ती जिल्ह्यातील आहेत. यात ज्यांना सर्दी, खोकला, ताप, घसा दुखीसह अन्य काही आजारांची लक्षणे आहेत. अशा व्यक्तींना कोरोना विलगीकरण उपचार कक्षात दाखल केले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरजेच्या शासकीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. 
कसबा बावडा मराठा कॉलनीतील 63 वर्षीय महिला कोरोना मुक्त झाली. मात्र त्यांना न्युमोनिया सदृश लक्षणे असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना प्रकृती सुधारल्यानंतर डिस्चार्ज मिळणार आहे. 
या शिवाय मुंबईहून कर्नाटककडे कंटेनरमधून प्रवास करणारे जिल्ह्या बाहेरील एक पुरुष व महिला असे दोघे, उचत (ता. शाहूवाडी) येथील महिला, मुंबईवरून नुकताच आलेला 36 वर्षीय युवक व भुदरगडमधील करोनाबाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

ते विद्यार्थी क्वॉरंटाईन 
कोटा राजस्थान येथून आलेल्या विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी झाली आहे. यात खबरदारीची भाग म्हणून काहीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवलेले आहे. मात्र त्यांच अहवाल आज रात्री नऊ वाजेपर्यत आलेला नव्हता. या सर्व विद्यार्थ्यांना क्वॉरंटाईन केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT