कोल्हापूर

सीपीआरमध्ये 386 व्यक्तींची कोरोनाची तपासणी

प्रतिनिधी

कोल्हापूर ः सीपीआर कोरोना रुग्णालयात आज दिवसभर 386 व्यक्तींची कोरोना तपासणी झाली. यात विविध आजारांतील 8 नवीन रुग्ण दाखल झाले. नवे-जुने मिळून 76 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 90 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविलेले आहेत, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. नव्या-जुन्या एकूण सात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती स्थिर आहे तर दोघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 
जिल्ह्यातील आजरा, चंदगड येथील तीन कोरोनाबाधितांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घेऊन तीन व्यक्ती आजऱ्याकडे आल्या होत्या. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्यासोबत आलेली 41 वर्षीय महिला व 20 वर्षीय युवक हे दोघे कोरोनाग्रस्त आढळले. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. त्या पाठोपाठ चंदगडमधील एक 55 वर्षीय व्यक्तीही कोरोना पॉझिटिव्ह आली. या तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील अन्य व्यक्तींना ग्रामीण रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठविले आहे. त्यापैकी काहींचे स्वॅब घेतले आहेत; मात्र अहवाल आलेला नाही, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike : राज्यात दूध विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ; १६ नोव्हेंबरपासून नवीन दर लागू

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

Latest Marathi News Live Update: दिल्लीत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या महत्त्वाच्या बैठका

SCROLL FOR NEXT