कोल्हापूर : कोणत्याही केमिकलशिवाय कोरोना संसर्ग टाळता येणारे उपकरण कोल्हापुरातील मित्रांनी बनविले आहे. अतीनील किरणे, पंखा, वायू अशा माध्यमातून हे उपकरण तयार केले आहे. यामुळे विषाणुंपासून संरक्षण होते. कार्यालय, बॅंक, कारखाने, चित्रपटगृहे, रुग्णालये, मॉल, शाळा-महाविद्यालये, पार्टी-मंगल कार्यालयांतही याचा वापर सहज करता येतो. मोरेवाडी येथे राहणारे स्वतः अंध असलेले सुहास गोदडे-पाटील आणि कळंबा येथील विराज शिंदे या मित्रांनी हे उपकरण तयार केले आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत. हे उपकरण तयार करून विक्रीसाठी सामाजिक संस्था, संघटनांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे.
कोरोना महामारीमुळे या उपाय योजना केल्या जात असल्या तरीही कायमस्वरुपी कोणत्याही विषाणुपासून संरक्षित रहाण्यासाठी दोघा मित्रांनी एक उपकरण तयार करण्याचा निर्णय मार्च मध्ये घेतला. आणि नुकताच त्यांना यश मिळाले. प्रातिनिधी म्हणून त्यांनी एक डोमच्या पद्धतीने त्याचे प्रात्यक्षिक घेतले. ते यशस्वी झाल्याचा दावा पाटील आणि शिंदे यांनी केला आहे. यातून विषाणुपासून संरक्षण होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.
उपकरण बसविल्यानंतर थर्मल स्कॅनर घेवून कोणतीही व्यक्ती बसवावी लागत नाही. तसेच जी व्यक्ती संशयास्पद आहे, ती व्यक्ती या उपकरणातून आत येतानाच अलर्ट वाजला जातो किंवा ठराविक रंगाची लाईट लागते. हे उपकरण पूर्णपणे भारतीय बनावटीचे व शास्त्रीयदृष्ट्या योग्य असल्याचाही दावा उपकरण बनविणाऱ्या दोघांचा आहे. तीन प्रकारात हे उपकरण तयार केले आहे. त्यांची किंमत सुमारे दीड लाखांपासून ते अडीच-तीन लाखांपर्यंत आहे.
उपकरणाची वैशिष्ट्ये
कोणत्याही ठिकाणी बसविता येते. ‘टायमर’मुळे ठराविक वेळेत सॅनिटायझर होऊ शकते. पंखा, वायू, अतीनील किरणे इतकेच सुटे भाग. बेसिक, सेमी आणि फुल्ल ॲटोमेटिक असे तीन प्रकार. पूर्ण शास्त्रीय पद्धतीचे उपकरण. कोठेही हलविता येणे सहज शक्य. थर्मल स्कॅनरची आवश्यकता नाही. संसर्ग असलेली व्यक्ती तातडीने रोखते.
हेही वाचा- स्पर्धा परिक्षा करुन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलेले विद्यार्थी आहेत अस्वस्थ ; ही आहेत त्याची कारणे
अल्प खर्च
उपकरण कार्यालयाच्या बाहेर बसविल्यावर त्यातच येणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र टिपण्याची व्यवस्था. थर्मल स्कॅनिंग करून ताप दाखविण्याची खास व्यवस्था. यासाठी स्वतंत्र व्यक्ती बसवावी लागत नाही. तसेच, रोज आठ तास याप्रमाणे महिनाभर वापरल्यास महिन्यासाठी दोन ते अडीचशे रुपये इतके कमी विजेचे बिल अपेक्षित असल्याचेही पाटील आणि शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.