Counterfeit masks are sold in Belgaum 
कोल्हापूर

कोरोना पासून बचावासाठी मास्क खरेदी करताय ? तर ही बातमी वाचाच....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - शहरात मास्क विक्रीच्या नावाखाली काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बेळगाव येथील काही औषध विक्री दुकानांत एन ९५ या बनावट मास्कची विक्री केली जात असल्याचे समोर येताच अन्न व औषध विभागाने छापा टाकून कारवाई केली. या वेळी तब्बल ३५ दुकानांवरील छाप्यातून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

एन ९५ मास्कद्वारे कोरोना आजाराला थोपविणे शक्‍य

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हळूहळू हा आजार विविध देशांत पाय पसरत आहे. भारतात याचे ५५ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, सॅनेटायझर आणि मास्कची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यातच बनावट मास्कची विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. एन ९५ मास्कद्वारे कोरोना आजाराला थोपविणे शक्‍य आहे. त्यामुळे बेळगावात दुसऱ्या कंपनीचे व सुमार दर्जाचे मास्क एन ९५ असल्याची माहिती देऊन चढ्यादराने विक्री केली जात आहे. याची माहिती मिळताच अन्न व औषध विभागाच्या पथकाने छापा घालून बनावट मास्क जप्त केले. तसेच ३५ औषध विक्री दुकानांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन बनावट मास्क आणि औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली आहे. यासंदर्भात महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी बनावट मास्कविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल. बनावट मास्कविरोधात आरोग्य विभागाने मोहीम उघडली आहे. महापालिका अशा औषध विक्री दुकानांचा परवाना रद्द करण्याची भूमिका घेण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT