couple dies in accident at belgaum
couple dies in accident at belgaum 
कोल्हापूर

दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; पती-पत्नीचा मृत्यू 

अमृत वेताळ

बेळगाव : दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होउन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी ठार झाले. सोमवार (ता.10) रात्री आठच्या सुमारास बेळगाव बागलकोट रोडवरील करडीगुद्दी नवीन बसस्थानकाजिक हा अपघात घडला असून नागाप्पा पंडीतप्पा तिगडी (वय 45) आणि निर्मला नागाप्पा तिगडी (वय 39, रा. मोहर ता. बैलहोंगल) अशी मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. अपघाताची नोंद मारिहाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. 

पोलिसांनी बसाप्पा रुद्राप्पा बद्रमण्णवर (रा. हनमनट्टी ता. बैलहोंगल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. 

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, संशयित बसाप्पा हा काल आपल्या दुचाकीवरून ( केए 22 एचडीसी 7569) करडीगुद्दी हायस्कूलकडून बेळगाव बागलकोट रस्त्याकडे भरधाव वेगाने येत होता. रस्त्याकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे वाहन चालवत असताना मारिहाळकडून मोहरकडे जाणाऱ्या तिगडी यांच्या दुचाकीला(केए 24 एक्‍स 7135 क्रमांकाच्या ) त्याने समोरुन जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की समोरच्या दुचाकीवरील पत्नी-पत्नी रस्त्यावर कोसळले. रस्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या नागाप्पा यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा काहीवेळातच मृत्यू झाला. तर निर्मला यांचा आज सकाळी सहाच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 अपघाताची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी पूजा नागाप्पा तिगडी (रा. मोहर (ता. बैलहोंगल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बसाप्पा बद्रमण्णावर (रा. हनमनट्टी ता. बैलहोंगल) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. जिल्हा रुग्णालयात शवागृहात शल्यचिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मारिहाळचे पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर पुढील तपास करीत आहेत. 


संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT