court can lead to 10th exam petition
court can lead to 10th exam petition 
कोल्हापूर

मोठी बातमी; ...अखेर दहावीच्या परीक्षेचा मार्ग मोकळा 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दहावीची परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होण्याचा मार्ग मोकळा झाला असून परीक्षा रद्द करण्याबाबत न्यायालयात दाखल झालेली याचिका फेटाळण्यात आली आहे. मात्र दहावीची परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची अधिक काळजी घ्या, अशी सूचना न्यायालयाने शिक्षण खात्याला केली आहे. 

शिक्षण खात्याने 25 जून ते 4 जुलै दरम्यान दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अॅड. लोकेश कुमार यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याबाबत बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली.

 यावेळी न्यायालयाने परीक्षा घेताना विधार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या, तसेच परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात, अशी सूचना केली आहे. 

शिक्षण खात्याने दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करीत परीक्षेची तयारी सुरू केली आहे.  मात्र दहावी परीक्षा रद्द करावी अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्यापासून शिक्षण खात्याचे लक्ष सुनावणीकडे लागून राहिले होते. 

लोकेश कुमार यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे परीक्षा काळात मुलांनाही त्याचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना पास करावे अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र न्यायालयाने सुनावणीवेळी शिक्षण खात्याला दिलासा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT