मार्ग मोकळा ः नोकरीसाठी गोव्यात जाणाऱ्यांना ई-पास मिळणार

Those going to Goa for jobs will get e-pass
Those going to Goa for jobs will get e-pass

सावंतवाडी : गोव्यात कामाला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी जिल्हा प्रशासन एकत्ररीत्या ई-पासची व्यवस्था करणार आहे. त्याआधी संबंधितांनी तालुक्‍याच्या तहसील कार्यालयात आपल्या नावाची नोंद करायची आहे. ही नोंद झाल्यानंतर सर्वांची कोविड तपासणी करून ती निगेटिव्ह आल्यानंतर गोवा सरकारशी चर्चा करून त्यांना गोव्यात पाठविण्यात येणार असल्याची माहिती येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी  मंगळवारी दिली. 

गोव्यात कामाला असलेल्या युवकांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींना सर्वप्रथम "सकाळ'ने वाचा फोडत वस्तुस्थिती समोर आणली होती. त्यानंतर तरुणांना गोव्यात प्रवेश मिळण्यासाठी हालचालींना वेग आला. या भागाचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात दखल घेताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली होती. यातून जिल्ह्यात अडकलेल्या तरुण-तरुणींना गोव्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी काहीशा दूर झाल्या; मात्र गोव्यात जायचे झाल्यास गोवा शासनाचा ई-पास आवश्‍यक होता; पण हा ई-पास उपलब्ध होत नसल्याने एक नवी समस्या तरुणांसमोर उभी होती. हा विषय "सकाळ'ने पुन्हा एकदा मांडला. "गोवा प्रवेशाचा ई-पास मिळेना' या मथळ्याखाली आज वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल पुन्हा एकदा आमदार केसरकर यांनी घेऊन जिल्हा प्रशासन, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री सावंत त्यांचे लक्ष वेधले. जिल्हा प्रशासनाने गोव्यात कामाला असलेल्या युवक-युवतींची नोंद तहसील कार्यालयाच्या ठिकाणी घेण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना दिले. 

हे पण वाचा - जिल्ह्याच्या हितासाठी आम्ही उद्रेकाच्या उंबरठ्यावर  : नितेश राणेंचा इशारा ..

"सकाळ' ने ई-पासबाबत वृत्त प्रसिद्ध करताना जिल्ह्यातील तरुणांना ई-पास कसा नाकारला जातो, हे वास्तव समोर आणले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा प्रशासनाने गोवा प्रशासनाची चर्चा केली. त्यानुसार याठिकाणी गोव्यात जाणाऱ्या सर्वांची कोविड तपासणी जिल्हा प्रशासनाकडून करण्याचे निश्‍चित झाले. त्यामुळे गोव्यामध्ये गेल्यावर इथल्या तरुणांना दोन हजार रुपये खर्च आता करावा लागणार नाही. 

निवास व्यवस्था मात्र हवी!

याबाबत तहसीलदार म्हात्रे म्हणाले, ""गोव्यामध्ये ज्यांची राहण्याची व्यवस्था आहे, त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आपली नोंद करायची आहे. तहसील कार्यालयामध्ये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, नोंद झाल्यानंतर चार दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्वांचे कोविड तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर संबंधितांचे एकत्रित ई-पास काढून त्यांना गोव्यामध्ये पाठवण्यात येणार आहे. गावागावांतील सरपंचांनी आपल्या भागातील गोव्यातील तरुणांना याबाबत कल्पना देताना त्यांची नोंद येथील तहसील कार्यालयामध्ये करावी.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com