create whatsapp group for marriage it's free for people in belgaum 
कोल्हापूर

लग्न जमवण्याचा नवा ट्रेंड ; व्हाट्सऍपवर जुळताहेत रेशीमगाठी

मिलिंद देसाई

बेळगाव : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. मात्र सध्या लग्नासाठी नवरा मुलगा किंवा मुलगी सहजासहजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे शहरातील काही जणांनी पुढाकार घेत लग्न जमविण्यासाठी व्हाट्सऍपचा ग्रुप तयार करुन लग्न जुळविण्यासाठी मोठा हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. या ग्रुपवर लग्न पत्रिका पाठविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. 

आजकाल लग्न करताना मुला मुलींच्या अपेक्षा मोठ्‌या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे योग्य स्थळ मिळावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. मात्र अनेकांना यासाठी शोधाशोध करावी लागते. लग्न जमविण्यासाठी शहर आणि परिसरात अनेकांनी वधुवर सुचक केंद्र स्थापन केली आहेत. या केंद्रात नाव नोंदणीसाठी शुल्क भरावे लागते. तरीही वधु-वर सुचक केंद्राच्या माध्यमातुन लग्न ठरेल याची शाश्‍वती देता येत नाही. त्यामुळे अनेकांची अडचण होते, याची दखल घेत शहरातील काही जणांनी वॉटसऍप ग्रुप तयार करुन मोफत सेवा देण्यास सुरुवात केली आहे. 

आपल्या ओळखीच्या मुला मुलींची लग्न पत्रिका ग्रुपवर पाठवुन देण्यात येते. त्यानंतर तेथील पत्रिका पाहुन पालकांशी संवाद साधला जात आहे. ग्रुप तयार करण्यात आल्यानंतर सुरुवातीपासुनच अनेकजण आपल्या परिचयाच्या व्यक्‍तींची लग्न पत्रिका ग्रुपवर पाठवुन देत आहेत. त्यामुळे अनेकांची लग्ने जुळली असुन ग्रुप सुरु करण्याचा हेतु साध्य झाल्याचे मत अनेकांमधुन व्यक्‍त होत आहे. 

"लग्न जमविण्यासाठी अनेकांनी वधुवर सुचक केंद्रे सुरु केली आहेत. तरीही अनेकांची लग्ने वेळेत होत नाहीत. त्यामुळे एक समाजसेवा म्हणुन मराठा विवाह मंडळ म्हणुन वॉटसऍप ग्रुप तयार केला आहे. या ठिकाणी कोणीही लग्न पत्रिका पाठवु शकतो. त्यामुळे अनेकांना मोफत सुविधा मिळत असुन या तीन चार महिन्यात अनेकांची लग्न जमण्यास मदत झाली आहे."

- विनोद हंगिरगेकर

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT