Credit Unions Initiative For Scholarship Practice Examination In Shirol Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शिरोळला शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी पतसंस्थांचा पुढाकार

डी. आर. पाटील

शिरोळ : तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्याकरीता शिक्षकांच्या पतसंस्थेने पुढाकार घेतला आहे. या सराव परीक्षेकामी होणारा खर्च तालुक्‍यातील तीन पतसंस्था उचलणार आहेत. शिक्षक पतसंस्थेच्या या उपक्रमामुळे कोरोना काळात शिष्यवृत्ती परीक्षेकरीता बसलेल्या विद्यार्थ्यांना पाठबळ मिळाले आहे. 

शिष्यवृत्ती मिळवण्याचे स्वप्न जसे विद्यार्थ्याचे असते, तसेच स्वप्न त्या विद्यार्थ्याला घडविणाऱ्या शिक्षकाचे असते. मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा तसेच विनाअनुदानीत माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेकरीता बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देतात. तथापि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांकरीताही लोकप्रतिनिधी व शिक्षक विशेष लक्ष देत असल्याची घटना शिरोळ तालुक्‍यात पाहण्यास मिळत आहे.

शिरोळ तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या हुशार सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेकरीता फॉर्म भरला आहे. शिरोळ तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती मिळविली आहे. 

यावर्षी कोरोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्या. शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची एक सराव परीक्षा घेण्याकरीता पंधरा हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च उचलण्याकरीता तालुक्‍यातील शिक्षक पतसंस्था पुढे आल्या आहेत. शनिवारी (ता. 27) ही सराव परीक्षा झाली. या परीक्षेकरीता पेपर्स व अन्य बाबीकरीता झालेला खर्च साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने उचलला आहे. या संस्थेच्या विधायक कार्याचे कौतुक पालक वर्गातून करण्यात येत आहे. 

शिक्षण क्षेत्रास प्रेरणादायी
जिल्हा परिषदेकडील शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा सराव होण्याकरीता सराव परीक्षा घेण्याची संकल्पना गटशिक्षण अधिकारी दीपक कामत यांनी मांडल्यानंतर तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्थांनी सराव परीक्षेकरीता होणारा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकरली. ही बाब शिक्षण क्षेत्रास प्रेरणादायी आहे. 
- कविता चौगुले, सभापती, पंचायत समिती, शिरोळ. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचा रास्ता रोको.. पाण्यासाठी मेंढ्या ही रस्त्यावर

SCROLL FOR NEXT