कोल्हापूर

मोबाईल दुकानात चोरीप्रकरीणी दोघांना अटक; अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

सकाळ डिजिटल टीम

अंकली : येथील मोबाईल दुकानातील चोरीप्रकरणी दोघांना मुद्देमालासह (crimecase) पकडण्यात अंकली (ankli police) पोलिसांना यश आले आहे. यावेळी झालेल्या कारवाईत २ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमीन मोहम्मदरफिक पटेल व संजय नारायण भंडारे (दोघेही रा. औरवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत येथील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे 9 मे रोजी एका मोबाईल दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध कलम 457, 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रकरण गांभीर्याने दखल घेत तपास यंत्रणा गतीशील बनविली होती. त्यात अमीन मोहम्मदरफिक पटेल व संजय नारायण भंडारे यांना मुद्देमालासह पकडण्यात यश आले. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे 1 लाख 81 हजार 998 रुपये किंमतीचे 16 मोबाईल आहे. एक ७० हजाराची दुचाकी असा एकूण 2 लाख 51 हजार 998 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली.

या प्रकरणाचा तपास बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निम्बर्गी, जिल्हा पोलिस उपाधीक्षक अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चिक्कोडीचे उपाधीक्षक डीएसपी मनोजकुमार नाईक, मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंकली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एल. एम. आरी, कर्मचारी एस. एस. आरभावी, आर. एस. खोत, ए. एस. सप्तसागर, एस. टी. पुजारी यांच्या सहकार्याने झाला. या कामगिरीबद्दल पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतूक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT