crime esakal
कोल्हापूर

इचलकरंजी - नदीत ढकलून दिलेल्या 'त्या' बालिकेचा मृतदेह सापडला

कौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या अमानुष घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

हुपरी : यळगुड (ता. हातकणंगले) येथील नराधम सावत्र बापाने इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत ढकलून दिलेल्या प्रणाली युवराज साळुंखे (वय ९) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. (ichalakaranji crime case) इचलकरंजी पालिकेच्या रेस्क्यू पथकाने बोटीतून शोध घेत घाटावरून ढकलून दिलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर प्रणालीचा मृतदेह सापडला. (police) कौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या अमानुष घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, संशयित आरोपी युवराज आत्माराम साळुंखे याला पोलिसांनी अटक केली आहे. (crime case)

प्रणालीच्या अमानुष खून प्रकरणाचे सकाळी यळगुड येथे संतप्त पडसाद उमटले. ग्रामस्थांनी मोर्चा काढून व रस्त्यावर टायरी पेटवून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी फौजफाट्यासह यळगुड येथे धाव घेत लोकांना शांत केले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपी युवराज आत्माराम साळुंखे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आरोपीचे कोणत्याही वकिलाने वकीलपत्र न घेण्याची मागणी केली. दरम्यान, गावात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT