crime news dead Body in water supply pipeline in Gadchiroli city
crime news dead Body in water supply pipeline in Gadchiroli city esakal
कोल्हापूर

गडचिरोली शहरात पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृताचे नाव याेगेश शेषराव देवाेजवार (वय ३४) रा. विवेकानंदनगर, असे असून ही घटना शुक्रवार (ता. १०) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा मृतदेह पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये गेला कसा, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. पाईपालाईनमधून पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने चामोर्शी मार्गावरील फंक्शन हॉलजवळील पाईपलाईनचे व्हॉल्व खोदून बघितले असता पाईपलाईनमध्ये याेगेश देवाेजवारचा मृतदेह अडकून असल्याचे दिसून आले. मृतदेह व्हॉल्वमधून काढता येत नसल्याने जेसीबीने मोठा खड्डा खोदून पाईपलाईन मोकळी करण्यात आली.

त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. चक्क पाण्याच्या पाईपलाईनमध्ये एका मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. वृध्दाश्रमाजवळील पाण्याच्या टाकीतून चामोर्शी मार्गावरील वार्डात पाणी पुरवठा केला जातो. गोकुळनगर परिसरात पाणीपुरवठा करणारी छोटी व चामोर्शी मार्गावरील अन्य भागात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी पाईपलाईन असून या मोठया पाईपलाईनमध्ये मृतदेह आढळून आला. मृतदेह पाण्याच्या टाकीतून पाण्याच्या प्रवाहाद्वारे चामोर्शी मार्गावर वाहत आला असावा असा अंदाज आहे. मृत याेगेश देवाेजवार हा बुधवार (ता. ८) पासून बेपत्ता हाेता. यासंदर्भात त्याच्या कुटुंबीयांनी गुरूवार (ता. ९) गडचिराेली शहर पाेलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली हाेती. मृतदेह बाहेर काढला असून मर्ग दाखल करण्यात आल्याचा माहिता ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT