Crime news Kolhapur One was killed for two hundred rupees sakal
कोल्हापूर

Kolhapur Crime News: दोनशे रुपयांच्या उधारीसाठी एकाचा खून

पाच जणांना अटक; धारदार शस्त्राने वार

राजेश नागरे

गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथे गणेश नामदेव संकपाळ (वय ४० रा. गणेश कॉलनी उचगाव) याचा निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

हल्लेखोरांनी त्याच्या पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार केले आणि त्यानंतर सिमेंट पाईपचा तुकडा डोक्यात घातला. पानपट्टीच्या उधारीवरून खून करण्यात आल्याचे गांधीनगर पोलिसांनी सांगितले. (Crime news Kolhapur One was killed for two hundred rupees)

पोलिसांनी याप्रकरणी दिलेली माहिती अशी ः पोलिसांनी दिवसभरात कारवाई करत याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.

त्यात विकी ऊर्फ वेंकटेश संजय जगदाळे (रा. चपाले गल्ली), रतन कुमार रमेश राठोड (वय २०), ओम गणेश माने (२१, तिघे रा. उचगाव), रोहन गब्बर कांबळे (२०, रा. टेंबलाई नाका रेल्वे फाटक, कोल्हापूर), करण राजेंद्र पुरी (२३, रा. रेस कोर्स नाका संभाजीनगर, कोल्हापूर) आदींचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद संकपाळ यांची पत्नी दैवशाला यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले, की संकपाळ याने काही दिवसांपूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले होते. तो, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तब्येत बिघडली आहे, डॉक्टरांकडे जातो, असे सांगून घरात बाहेर पडला. त्याने रात्री साडेदहाच्या सुमारास विकी जगदाळे याच्या पानटपरीतून सिगरेटचे पाकीट उधारीवर घेतले.

तो, पैसे देण्यासाठी आला नाही म्हणून विकीने मित्रासमवेत त्याचा शोध घेतला. या सर्वांना संकपाळ कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सापडला. उधारीच्या पैशावरून त्यांच्यात तेथे वादावादी झाली.

त्यातून धारदार शस्त्राने आणि सिमेंटच्या पाईपने खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी अनिकेत गोसावी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपासाची सूत्रे हलविली. (Latest Marathi News)

गांधीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, मोहन गवळी, आकाश पाटील, आयुब शेख, चेतन बोगाळे, राजू नाईक, अशोक पोवार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली. अवघ्या काही तासात पाच संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सिनेस्टाईल पाठलाग, झटापटीत पोलिस जखमी

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हा अन्वेषण पथकाला यातील संशयित संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाली. तेथे हवालदार मोहन गवळी, आकाश पाटील व आयुब शेख यांनी छापा टाकला; पण संशयित पळाले. (Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. हा सिनेस्टाईलचा थरार होता. त्यावेळी झालेल्या झटापटीत हवालदार आकाश पाटील जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT