Dams In Ajara Taluka Filled Up Kolhapur Marathi News
Dams In Ajara Taluka Filled Up Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजरा तालुक्यातील बंधारे तुडुंब

रणजित कालेकर

आजरा : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने हात दिल्याने तालुक्‍यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. पाटबंधारे विभागाने पाणी अडवल्याने बंधारे तुडुंब भरले आहेत. आजरा गडहिंग्लज कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात सुमारे 593 दसलक्ष घनफूट (अर्धा टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. याचा लाभ रब्बी, उन्हाळी पिकांना होणार आहे. 

यंदा तालुक्‍यात सुमारे 2600 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चित्री प्रकल्पात 3155 मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला आहे. महापूर नियंत्रणासाठी महसूल व पाटबंधारे प्रशासनाने चित्रीतील पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी सोडल्यामुळे चित्री प्रकल्प भरण्यास यंदा गतवर्षीपेक्षा थोडा विलंब लागला. पण पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेन भरला आहे. 1886 दसलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्याचा लाभ आजरा व गडहिंग्लज तालुक्‍यातील रब्बी व उन्हाळी पिकांना होणार आहे.

हिरण्यकेशी, चित्री व तारओहळमधील बंधाऱ्यात पाटबंधारे विभागाने पाणी अडवले आहे. आजरा तालुक्‍यातील करपेवाडी ते गडहिंग्लज तालुक्‍यातील खणदाळ बंधाऱ्यापर्यंत पाणीसाठा करण्यात आला आहे. डिंसेबर महिन्या अखेर चित्री प्रकल्पातून आवश्‍यकतेनुसार पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

सर्फनाला प्रकल्पाअंतर्गत आजरा तालुक्‍यातील सुळेरान, देवर्डे, दाभिल, साळगाव या बंधाऱ्यात 150 दसलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. हे पाणी मे महिन्यांपर्यंत पुरवण्याचे नियोजन आहे. उचंगी प्रकल्पाच्या तारओहळ ओढ्यावरील दहा बंधाऱ्यात पाणी अडवले आहे. सुमारे 22 दसलक्ष घनफूट पाणी साठवण्यात करण्यात आला आहे. 

ऊस क्षेत्र हेक्‍टरमध्ये 
- हिरण्यकेशी गडहिंग्लज ः 5500 हजार 
- चित्री प्रकल्पांतर्गत करपेवाडी, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, ऐनापुर ः 2500 
- उचंगी लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत 10 कोल्हापुरी बंधारे (धनगरवाडी ते ऐनापुर) ः 1150 
- सर्फनाला प्रकल्पांतर्गत (सुळेरान, साळगाव, देवर्डे, दाभिल) ः 1275 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT