Jyotiba Temple esakal
कोल्हापूर

Jyotiba Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! जोतिबा देवाच्या मूर्तीचं दर्शन 'इतके' दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

Jyotiba Dongar : भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन व कळस दर्शन घेता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुरातत्त्‍व विभागातर्फे जोतिबा मूर्तीची संर्वधन प्रक्रिया रविवारपासून पाच दिवस होत आहे. त्यामुळे भाविकांनी या काळात प्रशासनास सहकार्य करावे.

जोतिबा डोंगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (Jyotiba Dongar) तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया रविवार (ता. ७) पासून पाच दिवस होणार आहे. या काळात मूर्तीचे (Jyotiba Idol) दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन व कळस दर्शन घेता येणार आहे. संवर्धन प्रक्रिया काळात भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समिती, पुजारी, गावकरी यांनी केले आहे. जोतिबा देवाची मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे (Paschim Maharashtra Devasthan Committee) प्रशासकांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्त्‍व विभागाला (Archaeology Department) वारंवार कळविले होते.

मूर्तीची संर्वधन प्रक्रिया करण्याबाबत पुरातत्त्‍व विभाग (पुणे) चे सहायक संचालक यांनी अहवाल दिला होता. त्यानुसार देवस्थान व्यवस्थापन समितीने ४ एप्रिल २०२४ ला पुरातत्त्‍व विभागाला संर्वधन प्रक्रिया करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार पुरातत्त्‍व विभागातर्फे मूर्ती संर्वधन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठीची सर्व तयारी करण्यात आली आहे.

पुरातत्त्‍व विभागातर्फे जोतिबा मूर्तीची संर्वधन प्रक्रिया रविवारपासून पाच दिवस होत आहे. त्यामुळे भाविकांनी या काळात प्रशासनास सहकार्य करावे.

-धैर्यशील तिवले, अधीक्षक, देवस्थान समिती कार्यालय जोतिबा डोंगर

संवर्धन कशासाठी?

यापूर्वी मूर्तीवर १९३५, १९८५ आणि २००७ मध्ये वज्रलेप झाला होता. ही मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने होणार संवर्धन प्रक्रिया

संवर्धन प्रक्रिया कशी?

प्रत्यक्ष संवर्धन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुठे काही भागाची झालेली झीज लक्षात येईल. त्यानुसार मग संवर्धनाची प्रक्रिया होईल.

प्रक्रिया किती दिवस?

सलग पाच दिवस म्हणजेच सात जुलै ते अकरा जुलै या कालावधीत संवर्धनाची प्रक्रिया होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT