dead Gaur was found in Bhogawati river kolhapur 
कोल्हापूर

भोगावती नदीत मृतावस्थेत आढळला गवा

राजू पाटील

राधानगरी - आज सकाळी पडळी पुलाच्या संरक्षण कठड्याला मृतावस्थेतील गवा अडकल्याचे आढळून आले. स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने या पुलावर सध्या पाणी आहे. याच्या लोखंडी संरक्षक बारला गवा अडकला होता. पाणी वाढल्यानंतर तो पुन्हा भोगावती नदीत प्रवाहित झाला.

काल सायंकाळी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सात स्वयंचलित दरवाज्यांपैकी दोन दरवाजे खुले झाले. मध्यरात्रीनंतर पुन्हा दोन दरवाजे खुले झाले. त्यामुळे धरणाच्या पायथ्या पासून काही अंतरावर असलेले पडळी पूल आणि तिथून दोन किलोमीटर असलेले पिरळ हे दोन्ही पूल पाण्याखाली गेले. आज सकाळी धरणाच्या दिशेने एक मृतावस्थेत गवा येऊन पडळी पुलाच्या संरक्षक लोखंडी बारला अडकला. अनेकांनी कमरे एवढ्या पाण्यातून जाऊन त्याचे शूटिंग केले, फोटो घेतले मात्र पुन्हा पाण्याचा प्रवाह वाढल्या नंतर तो गवा प्रवाहाबरोबर भोगावती नदीतून पुढे गेल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत वन्यजीव विभागाला समजल्यानंतर या खात्याचे कर्मचारी या गव्याच्या शोधात भोगावती नदीच्या काठावरून फिरताहेत. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगणे कठीण आहे.परंतु प्रवाहाबरोबर गुदमरून किंवा कड्यावरुन पडल्याने मृत्यू होऊ शकतो असे मत राधानगरीचे वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे यांनी व्यक्त केले आहे. तो सापडल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार आहे.

संपादन - मतीन शेख

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT