Defense hub to be held in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात होणार डिफेन्स हब? "हे' आहेत फायदे 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : देशातील संरक्षण अन्‌ हवाई उत्पादन क्षेत्रातील संशोधन व उत्पादनामधील परदेशी अवलंबित्व कमी होऊन देशातील संशोधनाला चालना मिळावी म्हणून राज्य शासनाने डिफेन्स हबची घोषणा करुन यामध्ये पुणे, नागपूर, अहमदनगर, नाशिक व औंरगाबाद या जिल्ह्यांचा समावेश केला आहे, या डिफेंन्स हबमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश व्हावा अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. 

याबाबत बोलताना खासदार मंडलिक म्हणाले, ""देशाच्या संरक्षण क्षेत्राची सुमारे 70 टक्के इतकी गरज ही आयातीद्वारे भागववली जाते. केंद्र शासन संरक्षण क्षेत्रासाठी करावी लागणारी आयात घटविण्यासाठी प्रयत्नशील आहे. डिफेंन्स हबसाठी आवश्‍यक असणाऱ्या बाबी कोल्हापूर जिल्हा पूर्ण करीत असून डिफेन्स हबमध्ये इतर पाच जिल्ह्यांसह कोल्हापूरचा समावेश झाल्यास सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे सार्वजनिक उद्योग, स्टार्टअप, वैयक्तिक इनोव्हेट्‌स, संशोधन अन्‌ विकास संस्थांसाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, या ठिकाणी नव्याने उद्योग येऊन या भागाच्या विकासाला चालना मिळणार असून देशी संशोधक व उद्योजकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जाणार असल्याने हा हब कोल्हापूरसाठी महत्वाचा आहे. 

या पार्श्वभूमीवर, या योजनेमध्ये शासनाने या उद्योगांसाठी सवलती व प्रोत्साहन जाहीर केले असल्याने मोठे उद्योजक व स्थानिक गुंतवणूकदार कोल्हापूर जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होणार असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली असून लवकरच बैठक आयोजीत करत असल्याचेही त्यांनी कळविले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Satara fraud:'बहुलेतील एकाची १३ लाखांची फसवणूक'; बनावट कागदपत्रांद्वारे माेटारीची विक्री, सहा जणांवर गुन्हा

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...

SCROLL FOR NEXT