Delivery by video call
Delivery by video call  
कोल्हापूर

मातेची होत होती घालमेल, शेवटी व्हिडिओ कॉलद्वारे झाली प्रसूती...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - बोरपाडळे येथून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मराठवाडी येथील राणी प्रदीप मराठे (वय २४) या गर्भवतीच्या पोटात सायंकाळी ४ वाजता दुखू लागले. सासू शारदा मराठे यांनी येथील आशा सेविकाशी संपर्क करून १०२ रुग्णवाहिकेला कॉल केला. जेऊरपर्यंत आणले असता प्रसूती प्रक्रिया सुरू होऊन बाळाचे पाय दिसू लागले. त्यामुळे चालकाने अधिपरिचारिकांशी संपर्क साधून बोलावून घेतले. त्यांनी मोटारसायकलने तत्काळ जाऊन धीर देत मातेला आरोग्य केंद्रात आणले.

पायाळू बाळ असल्याने मातेची खूप घालमेल होत होती. येथील अधिपरिचारिकांनी माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष तराळ यांना कॉल केला असता त्यांनी आपल्याला व्हिडिओ कॉलद्वारे पेशंटची परिस्थिती दाखवण्यास सांगितले. त्यानंतर मार्गदर्शन करत प्रसूतीबाबत सूचना केल्या आणि एका त्रासदायक वेदना सोसणाऱ्या मातेची सुटका केली. बाळासह माता सुखरूप आहेत. शिवाय वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी पोवार यांनीही सहकार्य केले.

पायाळू बाळ असलेल्या मातेची व्हिडिओ कॉलद्वारे स्वाभाविक प्रसूती करण्यात पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे आरोग्यवर्धिनी केंद्राने यश मिळवले. यामध्ये अधिपरिचारिका मनीषा पाटील, प्रणाली महापुरे, निवास कापरे, १०२ चे चालक श्रीकांत कुंभार यांची धडपड कौतुकास्पद म्हणावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला जबरदस्त दुहेरी धक्का! रहाणेपाठोपाठ शिवम दुबे 'गोल्डन डक'वर बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT