depression of insulting feeling one man attend a suicide in front of court in ichalkaranji kolhapur 
कोल्हापूर

मुंडण केल्याने आले नैराश्‍य अन् थेट न्यायालयाच्या आवारात पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील आवळे गल्लीतील जुगार क्‍लबवर केलेल्या कारवाईतील संशयित अमर निवृत्ती मगदूम (रा. वेताळ पेठ) याने येथील न्यायालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, मगदूम याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली.

येथील आवळे गल्लीतील घरात सुरू असलेल्या जुगार क्‍लबर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. कारवाईत मगदूम याच्यासह १४ जणांना अटक केली होती. या सर्वांवर गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व संशयितांचे मुंडण केल्याने ही कारवाई चर्चेत आली होती.

दरम्यान, आज मगदूम याने न्यायालयाच्या परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी आरडाओरड केल्याने पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनुचित प्रकार टळला. त्याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. मुंडण करण्यात आल्याच्या नैराश्‍येतून त्याने हा प्रकार केल्याची चर्चा घटनास्थळ परिसरात होती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

Commonwealth Games 2026: किराणा दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! बिंद्यारानी देवीने भारताला जिंकून दिले सहावे पदक

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Update: आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT