कोल्हापूर

'पुरामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी बॉक्स-टाईफ मोऱ्या बांधणार'

अर्चना बनगे

कोल्हापूर : कोल्हापुरात पूरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बॉक्स टाइप मोऱ्या बांधणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar Visit Kolhapur) यांनी दिली. कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. अलमट्टीमुळे कोल्हापुरात पूरस्थिती ओढवत नाही असे स्पष्ट करुन अजित पवार यांनी समितीच्या अहवालावरच बोटं ठेवले आहे.(deputy-chief-minister-ajit-pawar-Flood-Kolhapur-visit-spoke-to-reporter-kolhapur-live-update-akb8)

ते म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली शहराचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापुरातील काही भागात 32 इंच एवढा पाऊस पडला असून ,पुरामुळे अनेक भागाचे, घराचे, दुकानाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. कोल्हापुरातील परिस्थितीची मुख्यमंत्र्यांना माहिती देणार आहे. भविष्यात पूरस्थिती ओढवू नये याच्यासाठी समिती नेमणार आहे. अतिक्रमणासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणार आहे. नदी पात्रात बांधकाम झाले असेल तर ते हटवण्याचे काम ही आम्ही यापुढे करू असेही अजित पवार म्हणाले.

पूरग्रस्त भागात सध्या अत्यावश्यक सेवा सोडून इतरांना इंधन न देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. पूररेषेच्या पातळीच्यावर पुणे-बंगळुरु मार्गावर फ्लायओव्हर बांधण्याची नितीन गडकरींना विनंती करणार आहे.

परीस्थिती पूर्ववत करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु आहे. भुस्खलनाची घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना एक महिन्याचे रेशन मोफत देण्याचा विचार केला आहे. राज्य सरकार लवकरात लवकर मदत जाहीर करेल. पावसामुळे गोकुळच्या दूध संकलनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.अशी ही माहिती यावेळी त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT