death in river
death in river sakal
कोल्हापूर

सोलापुरातील भाविकाचा पंचगंगेत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सोलापूरवरून देवदर्शनासाठी आलेल्या तरुणाचा पंचगंगेत बुडून मृत्यू झाला. केशव नंदकुमार अलकुंटे (वय १८, रा. बुधवार पेठ सोलापूर) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की केशव अलकुंटे हा सोलापूरात राहत होता. तो गवंडी काम करत होता. तो मित्रांसोबत देवदर्शनासाठी आज सकाळी कोल्हापुरात आला होता. त्याच्यासह सर्व मित्रांनी पंचगंगा नदीत अंघोळ करून ते जोतिबा दर्शन व अंबाबाई मंदिरात दर्शनाचे नियोजन केले होते. घाटावरील हनुमान मंदिराजवळ तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याचे कपडे पायरीवर होते पण तो पाण्यात न दिसल्याने मित्रांनी त्याचा शोध सुरू केला.

दरम्यान याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशामक दलाने बोटीच्या सहायाने शोध मोहीम सुरू केली. तब्बल चार तासाच्या शोध मोहीमेनंतर आकराच्या सुमारास केशवचा मृतदेह दलाला मिळून आला. सीपीआरमध्ये शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याची वर्दी त्याच्या दौलतनगरात राहणाऱ्या चुलत्यांनी दिली. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ, काका असा परिवार आहे. अग्नीशमन दलाचे प्रभारी स्थानक अधीकारी कांता बांदेकर, योगेश जाधव, धनाजी यादव, शुभम कुंभार, संभाजी शिंदे, संग्राम मोरे यांनीही शोध मोहिम राबविली.

दुसरी दुर्घटना...

पचंगगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या राजेबागस्वार येथील एका तरूणाचा काल सायंकाळी तर सोलापूर येथील तरुण भाविकाचा आज सकाळी बुडून मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT