fight between drivers of Darisheel Mane and Rahul Prakash Awade Video Goes Viral 
कोल्हापूर

VIDEO : कपडे फाटोस्तर हाणामारी! धैर्यशील मानेंचा ड्रायवर अन् आमदार आवाडेंच्या पुत्राचा ड्रायव्हर एकमेकांना भिडले

Dhairyasheel Mane and Rahul Prakash Awade drivers Fighting Video : खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आलीय.

रोहित कणसे

खासदार धैर्यशील माने यांचे चालक आणि आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांचे चालक या दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरच ही हाणामारी सुरू होती. या दोघांनी चक्क एकमेकांना बेल्टने केलेल्या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून या भांडणाची सध्या जोरदार चर्चा होतेय.

कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आले होते. नदीतीरावरुन पाहणी करुन ते त्यांच्या ताफ्यासह नाट्यगृह येथील पूरग्रस्तांच्या छावणीत पोहचले. यावेळी मुश्रीफांसोबत खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे यांच्याही गाड्या होत्या.

यावेळी दोन नेत्यांच्या चालकांचा गाडीच्या पार्किंगवरून वाद झाला. दोन्ही नेत्यांची वाहने पार्किंग करत असताना एकमेकाला घासल्याने वाहन चालकांमध्ये हा वाद झाला. पुढे वाद वाढत जाऊन हाणामारीपर्यंत पोहचला. यावेळी शिवीगाळ करत दोघांनी एकमेकांना बेल्टने मारहाण देखील केली. यावेळी ड्रायव्हरते कपडे फाटल्याचे देखील पाहायला मिळाले. अखेर मुश्रीफांच्या ड्रायव्हरने तसेच इतर वाहनांच्या ड्रायव्हरांनी या दोघांमध्ये मध्यस्ती केली. यावेळी व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी देखील दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल होत असून या हाणामारीची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Pollution : कृष्णा नदीसह शेरीनाल्यात फेकल्या मेलेल्या कोंबड्या, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ; रात्री दहा ते बारादरम्यान 'स्टिंग ऑपरेशन'

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

JPSC-JSSC घोटाळ्याचा तपास वेगात; दिल्लीतून ISN संचालकाला अटक, ८०० OMR शीटची पडताळणी सुरू

धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

SCROLL FOR NEXT