Dhoom style, squeaky and scary silencer sound ...
Dhoom style, squeaky and scary silencer sound ... 
कोल्हापूर

धूम स्टाईल, कर्कश अन्‌ धडकी भरवणारा सायलेन्सरचा आवाज... 

राजेश मोरे

कोल्हापूर : सायलेंन्सरमध्ये अनावश्‍यक बदल करून लक्ष वेधण्यासाठी कर्कश आवाज निर्माण करत फेरफटका मारण्याची हटके क्रेझ सध्या तरूणाईमध्ये वाढत आहे. ही फॅशन इतर वाहन चालकांच्यात मनात धडकी भरवते. त्यातून अपघाताचे धोके निर्माण होत आहेत. अशा वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने लक्ष केंद्रीत केले आहे. याचीच झलक मध्यरात्री पर्यंत सात मोटार सायकलस्वारांवर कारवाईतून दिसून आली. 

मोटारसायकलची तरुणाईत मोठी क्रेझ आहे. इतरांपेक्षा वेगळी मोटारसायकल आपल्या जवळ असावी, इतरांचे लक्ष वेधले जावे, यासाठी खटाटोप सुरू असतो. आज स्वदेशी, परदेशी कंपन्यांच्या किमंती मोटारसायकलींना मोठी मागणी आहे. आपल्याला मिळाले नाही. मुलांच्या बाबतीत ते घडायला नको. यातून तरुणाईचा हट्ट पालकांकडून पुरविला जातो. सध्या शहर परिसरात अशा काही मोटारसायकली आहेत. की त्या रस्त्यावरून जाताना त्याचा आवाज इतर मोटारसायकलच्या तुलनेत खूपच मोठा येतो. या मोटारसायकलींच्या सायलेंसरमध्ये अनेक तरूण बदल करत आहेत. त्यातून कर्कश व धडकी भरणारा आवाज निर्माण केला जातो. चकाचक रस्त्यावरून हे तरूण मोटारसायकल बेदकारपणे चालवतात. त्यांच्या आवाजाने रस्त्यावरील इतर वाहन चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचे धोके निर्माण होऊ लागलेत. 

ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कसबा बावडा रस्ता अशा चकाचक रस्त्यावरून रात्री उशिरा काही तरूण मोटारसायकलवरून धूम स्टाईलमध्ये फिरतात. त्यांच्या मोटारसायकलच्या सायलेन्सरमध्ये अनावश्‍यक बदल करण्यात आले आहेत. अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेला मिळाली. पोलिसांनी सायंकाळनंतर मध्यरात्रीपर्यंत कारवाईची मोहीम राबवत सात मोटारसायकल जप्त केल्या. या तरुणांच्या पालकांनाही कारवाई दरम्यान बोलविण्यात आले होते. आपली मुले मध्यरात्री बाहेर असल्याचे त्यांना माहितच नव्हते. कारण या तरुणांनी बंगल्यातून मोटारसायकल ढकलत दूर अंतर नेऊन नंतर ती सुरू केल्याचे उघड झाले. संबधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सायलेन्सरमधील अनावश्‍यक बदल काढून टाकण्यास संबधितांना पोलिसांनी भाग पाडले. 

कंपन्यांना नोटीस पाठविण्यात येणार...
मोटारसायकलच्या सायलेन्सरमध्ये अनावश्‍यक बदल करता इतरांना करता येऊ नयेत, असे तांत्रिक बदल करावेत. याबाबतच्या नोटीसा मोटारसायकल कंपनींना पाठविण्यात येणार आहेत. 

सायलेन्सरमध्ये अनावाश्‍यक बदल करून कर्कश व धडकी भरविणारा आवाज निर्माण करणाऱ्या मोटारसायकलवर कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे. यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचीही मदत घेतली जाणार आहे. 
- वसंत बाबर, शहर वाहतूक शाखा, पोलिस निरीक्षक 


दृष्टिक्षेप 
- सायलेन्सरमध्ये बदल करून वेगळ्या आवाजाचा खटाटोप 
- लक्ष वेधणाऱ्या कर्कश आवाजाताची तरूणाईमध्ये क्रेझ 
- वाहतूक शाखेची सात जणांवर दंडात्मक कारवाई 
- ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कसबा बावडा रस्त्यावर अधिक प्रकार 
(संपादन ः प्रफुल्ल सुतार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT