khochi case  sakal
कोल्हापूर

ना आकाशकंदील.. ना आतषबाजी! ऐन दिवाळीत गावात सन्नाटा

रवींद्र पाटील

खोची (कोल्हापूर) : ना फटाके फुटले, ना आकाशकंदील लागले, ना रांगोळ्या रेखाटल्या गेल्या, ना पणत्या उजळल्या गेल्या, ना फुलांच्या माळा, तोरण सजले गेले! कारण होते येथील अत्याचारित बालिका खुनाच्या निषेधार्थ खोची (Khochi)ग्रामस्थांनी ही दीपावली (Diwali) काळी दिवाळी म्हणून पाळली. विशेष म्हणजे लहान मुलांनी आनंदाला आवर घालून फटाके फोडण्यासाठी हट्टही केला नाही.

रविवारी गावच्या इतिहासाला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना घडली. सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केला. शेजारच्या तरुणाने तिचा घात केला. दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर ही दुर्दैवी घटना घडली. ग्रामस्थांनी मृत मुलीला श्रद्धांजली म्हणून यंदाची दिवाळी साजरी न करण्याचे ठरवले. तरुणांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना उत्सव साजरा न करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिला.

दरवर्षी पहाटेपासून सुरू असणारी फटाक्यांची आतषबाजीचा आवाजही आला नाही. गावातील वातावरण सुन्न होते. रविवारीच ग्रामस्थांतून दिवाळीचा माहोल निघून गेला होता. मृत मुलीच्या गल्लीत, तसेच गावातील बहुतांश घरात दिवाळीचे पदार्थही बनवले गेले नाहीत. लहान मुलांनी किल्‍ल्याची केलेली तयारी अर्धवटच ठेवून, छोट्या बहिणीला श्रद्धांजली वाहिली. गावात फेरफटका मारताना कुठेही दिवाळीच्या सणाचा आनंदोत्सव दिसला नाही. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; परंतु खोची ग्रामस्थांचा हा सण अंधकारमय बनला आहे. गावातील लहान मुला-मुलीपासून ते ज्येष्ठ व्यक्ती, स्त्रियांनी नवीन पोशाख न घालता, जुना पोशाख परिधान करणे पसंत केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: शत्रूपक्षातील सौहार्द! संजय राऊतांची प्रकृती बिघडली; नरेंद्र मोदींचा ‘गेट वेल सून’ संदेश, खासदारांनी दिलं भावनिक उत्तर

चुकीचे काम करावे, नोकरी सोडावी म्हणून ‘फायनान्स’मधील तरुणीचा विनयभंग, छळ! ब्रॅंच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, एरिया क्रेडिट मॅनेजर, लिगल हेडसह १० जणांवर गुन्हा

Kannad News : कन्नड नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी ९ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर

Boisar Fire : बोईसरमधील कार्पेट कारखान्याला आग; चार कामगार गंभीर जखमी

Women’s World Cup 2025 Prize Money : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाला किती कोटींचं बक्षीस मिळणार? ICC ने केलीय मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT