Dog race in kolhapur kasaba beed 
कोल्हापूर

देशात चाललय काय अन् हे पळवताहेत रस्त्यावरून कुत्री 

सकाळ वृत्तसेवा

कसबा बीड (कोल्हापूर) : जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला जिल्ह्यात फैलावू नये म्हणून जिल्हाधिकारी शर्थीचे प्रयत्न करत असताना त्यांच्या आदेशाला हरताळ फासत कोगे (ता.करवीर) येथे श्‍वानांच्या शर्यती भर रस्त्यावर घेण्यात आल्या. 

जिल्ह्यात कोरोनाच्या फैलावाला आळा घालता यावा म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 144 कलम अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा व पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालून या विषाणूला जिल्ह्यात पसरू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु, अशा स्पर्धांना परवानगी नसताना त्या घेतल्याच कशा असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. 
येथील काही हौशी तरुणांनी डॉग शर्यत स्पर्धेचे आयोजन केले होते. भर ऊन्हात कुत्र्यांच्या पायांचे तळवे सालटून जात होते तरीही हौशी तरूण मोठ्या जोशात होते. यामध्ये गावातील व परिसरातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आरोग्याचा गंभीर होऊन बसलेला प्रश्न तसेच लागू केलेल्या जमावबंदी आदेशा बाबत स्थानिक प्रशासन व पोलिस पाटील यांनी संयोजक स्पर्धकाना समजावून सांगितले होते. पोलिस अधिकाऱ्यांना फोनवरून कळवले. त्यांनी स्पर्धा न घेण्याचे सक्तपणे सांगितले. मात्र त्यांचाही हुकूम डावलून या तरुणांनी स्पर्धा घेतली. 

कोरोना व्हायरस वेगाने फैलावत असल्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न जटिल बनला आहे. नागरिकांच्या आरोग्याची खास खबरदारी आणि संसर्गापासून बचाव करता यावा, प्रादुर्भाव वाढला जाऊ नये, वैयक्तिक आरोग्याची विशेष काळजी घेता यावी या हेतूने जिल्हा शासनाने शाळा, कॉलेज, मंदिरे, आठवडे बाजार, दुकाने, पर्यटनस्थळे, स्थानिक यात्रा, जत्रा, विविध स्पर्धा  बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जमावबंदी आदेश लागू केला आहे. खबरदारी व सार्वजनिक हिताचा आदेश धुडकावून आरोग्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत चक्क भर रस्त्यावर ही स्पर्धा घेतली जाते. याला कोण जबाबदार? संबंधितांवर कारवाई होणार का? वरिष्ठांकडून याची दखल घेतली जाणार का? अशा तीव्र भावना ग्रामस्थांतून व्यक्त केल्या जात आहे. 

स्पर्धेची कुणकुण लागताच घटनास्थळी पोहोचलो. त्या उत्साही तरूणांनी न ऐकता स्पर्धा सुरूच ठेवल्या. शेवटी वरिष्ठांना फोन करून कल्पना दिली. वरिष्ठांनी त्या मुलांना फोनवरून समजावले तरीही स्पर्धा सुरूच ठेवल्याने अशा तरूणांवर कार्यवाही झाली पाहिजे. 
-दत्तात्रय मिठारी, पोलिस पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT