बिद्री ता. कागल येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ५९  व्या गळीत हंगामाचा गव्हाणीत ऊस मोळी टाकून शुभारंभ करताना पद्मश्री डाँ. डी. वाय. पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले आदी मान्यवर. sakal
कोल्हापूर

केपींच्या नेतृत्वाखाली बिद्रीची प्रचंड प्रगती होईल; डी. वाय. पाटील

दत्तात्रय वारके

बिद्री (कोल्हापूर) : गेल्या सतरा वर्षात के. पी. पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळून  अनेक अडचणींना सामोरे जात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी व संचालक मंडळाने केलेले रचनात्मक कार्य कौतुकास्पद आहे.  त्यांच्याच नेतृत्वाखाली बिद्री साखर कारखाना यापुढेही प्रचंड प्रगती साधेल, असा विश्वास माजी राज्यपाल पद्मश्री डाॅ. डी. वाय. पाटील (D.Y.Patil) यांनी व्यक्त केला.

बिद्री ता. कागल येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या गळीत हंगामाचा त्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. तत्पुर्वी ऊस तोडणीचा शुभारंभ संचालक अशोक कांबळे यांच्या हस्ते तर काटा पुजन संचालक एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गव्हाणीचे विधीवत पुजन संचालक राजेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी सौ. निर्मलादेवी पाटील या उभयतांच्या हस्ते झाले.

के. पी. पाटील म्हणाले,  बिद्री कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम पुर्ण झाले आहे. येत्या तीन - चार दिवसात गाळपास प्रारंभ केला जाईल. यावर्षी ऊसाची उपलब्धता मुबलक आहे.  त्यानुसार तोडणी नियोजन केले आहे. बीड भागातील पावणे दोनशे टोळ्या कारखान्यावर दाखल झाल्या आहेत. स्थानिक व बाहेरील टोळ्यांच्या माध्यमातून तोडणी यंत्रणा सक्षम केली जाईल.  त्यामुळे तोडणी व वाहतुकीची अडचण निर्माण होणार नाही. बिद्रीच्या व्यवस्थापनावर तमाम सभासदांचा प्रचंड विश्वास आहे. कारखान्याकडे २७ कोटीच्या ठेवी स्वेच्छेने ठेवून कारखान्यावरील विश्वास दृढ केला आहे.

या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक सर्वश्री ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, संचालिका सौ. निताराणी सुनिलराज सुर्यवंशी, सौ. अर्चना विकास पाटील, कामगार संचालक भिमराव किल्लेदार व शिवाजी केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांच्यासह आजी-माजी संचालक, तोडणी-वाहतुक कंत्राटदार, ट्रक, ट्रँक्टर चालक वाहक, तोडणी-वाहतुक कामगार, कारखानांतर्गत विविध कामांचे ठेकेदार, कामगार, सभासद चार तालूक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. स्वागत कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले. आभार उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी मानले.

वेतनवाढीची कार्यवाही पुढील महिन्यात

साखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढीचा निर्णय शासनाने घेतला आहे. साखर कारखानदारीत अनेक अडचणी असल्या तरी कामगारांच्या हितासाठी बिद्री कायमच अग्रेसर असून बिद्री साखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. वेतनवाढीची अंमलबजावणी पुढील पगारापासून केली जाईल तर वेतनवाढीच्या फरकाची रक्कम तीन टप्प्यात दिली जाईल असे आश्वासन गळीत हंगाम समारंभात अध्यक्ष के. पी. पाटील यांनी व्यक्त केले. वेतनवाढ अंमलबजावणीची अध्यक्ष पाटील यांनी घोषणा केल्याने बिद्रीच्या कामगारांमध्ये उत्साह पसरला आहे.

फोटो ओळी -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT