The Education Department has prepared the rules ten Class exams  
कोल्हापूर

दहावीची परीक्षा देताय ? तर हे वाचाच...!

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - दहावी परीक्षेत गोंधळ होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने नियमावली तयार केली आहे. परीक्षार्थ्यांनी काय करावे व काय करु नये यासाठी २२ नियम बनविले आहेत. या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांसह विद्यार्थ्यांना मोबाईल वापरता येणार नाही. परीक्षेला सुरवात झाल्यानंतर पहिला अर्धा तास विद्यार्थ्यांना कोणत्याही कामासाठी बाहेर जाता येणार नाही.

केंद्रावर मोबाईलबंदी, पहिला अर्धा तास बाहेर जाण्यावर निर्बंध

दहावीच्या वार्षिक परीक्षेला २७ मार्चपासून सुरवात होणार आहे. ९ एप्रिलला परीक्षेची सांगता होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची माहिती नसते. त्यामुळे शिक्षण खात्याने नियमावलीबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर स. ९.१५ वाजता हजर असणे आवश्‍यक आहे. परीक्षा क्रमांक असलेल्या खोलीत जाताना प्रवेशपत्र आवश्‍यक आहे. पर्यवेक्षकांनी प्रवेशपत्र दाखविण्याची सूचना केल्यानंतर ते दाखविणे बंधनकारक असेल. अन्यथा बाहेर काढले जाईल. परीक्षा काळात कोणताही कागद किंवा पुस्तक घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी असेल. 

काळ्या वा निळ्या शाईने पेपर लिहिण्याची संधी

उत्तरपत्रिकेवर प्रवेशपत्रावरील क्रमांक योग्य प्रकारे लिहावा. तसेच उत्तरपत्रिका लिहून पूर्ण झाल्यानंतर पुरवणी पेपर घेतल्यास त्या ठिकाणीही प्रवेशपत्रावरील क्रमांक लिहावा. पेपर लिहिताना किती पुरवणी पेपर घेतले याची माहिती उत्तरपत्रिकेवर लिहावी. पेपरला सुरवात झाल्यानंतर बाहेर जायचे असल्यास उत्तरपत्रिका व प्रश्‍नपत्रिका पर्यवेक्षकांकडे जमा करुन जाणे आवश्‍यक आहे. क्रमांक लिहिलेल्या जागेवरच बसावे लागेल. काळ्या वा निळ्या शाईने पेपर लिहिण्याची संधी असणार आहे.

परीक्षा केंद्रावर पोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय करु नये याबाबत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना माहिती देणे आवश्‍यक आहे. परीक्षा काळात प्रवेशपत्र सोबत असणे आवश्‍यक आहे. तसेच पेपर लिहिताना कोणती काळजी घ्यावी याबाबत अधिकृत पत्रक जाहीर करुन माहिती देण्यात आली आहे.
- ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

SCROLL FOR NEXT