Eight more vaccination centers in Ichalkaranji city 
कोल्हापूर

इचलकरंजी  शहरातआणखी आठ लसीकरण केंद्रे 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी  : शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची मोहीम राबविण्यासाठी शहरात आणखी आठ लसीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत. सध्या "आयजीएम'सह सात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरणाबरोबर 
एकूण 15 लसीकरण केंद्रे शहरात असणार आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कमी कालावधीत नागरिकांना लस देण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. त्यांनी आज वाढत्या कोरोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयजीएम रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. 

आमदार आवाडे म्हणाले, ""शहरातील लसीकरणाचे उद्दिष्ट मोठे आहे. सध्या कोरोनाचा शिरकाव झपाट्याने वाढत असल्याने कोरोना बधित रुग्णांची शंभरी गाठली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला बळ दिल्यास नक्कीच वाढता कोरोनाचा संसर्ग रोखू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांना मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण करण्याची मागणी केली होती; मात्र आरोग्य यंत्रणेवर मर्यादा येत असल्याने लसीकरण केंद्रे वाढवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिला. त्यानुसार शहरात लसीकरण केंद्रे उभारण्याचे नियोजन केले आहे.  या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेट्टे, डॉ. महेश महाडिक, आरोग्य सभापती संजय केंगार, विलास गाताडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, प्रकाश मोरे, नगरसेवक दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, कपिल शेटके आदी उपस्थित होते. 


होमक्वारंटाईनवर कडक निर्बंध 
कोरोना बाधितांपैकी सर्वाधिक रुग्णांना सौम्य लक्षण दिसून येत आहेत. अशा रुग्णांना होमक्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत. या रुग्णांसाठी कडक निर्बंध करून त्यांची नोंद पालिका प्रशासनाकडे ठेवावी, अशा सक्त आमदार आवाडे केल्या. जेणेकरून होमक्वारंटईनवर रुग्णांपासून पासून होणारा प्रादुर्भाव रोखता येईल.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT