election fever on village level shivsena and jansuraj party on groud in shahuvadi kolahpur 
कोल्हापूर

हाय व्होलटेज लढती ; शिवसेना - जनसुराज्यमध्ये रंगणार सामना

शाम पाटील

शाहूवाडी (कोल्हापूर) : तालुक्‍यातील शिरगाव ग्रामपंचायतीसाठी शिवसेना विरुद्ध जनसुराज्य अशी दुरंगी लढत होत आहे. गतवेळी जनसुराज्यचे संभाजी भोसले व रवींद्र यादव यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकून शिवसेना गटाचे प्रमुख व विश्वास कारखान्याचे माजी संचालक मारुती पाटील यांच्याकडील २५ वर्षांची एकहाती सत्ता काढून घेतली होती.

पूर्वी येथे सरुडकर पाटील गटाविरोधात गायकवाड गट, अशी लढत होत होती. त्यात सलग २५ वर्षे सरूडकर पाटील गटाचे वर्चस्व राहिले. मात्र, गेल्या निवडणुकीपासून शिवसेना विरुद्ध जनसुराज्य, अशी लढत सुरू झाली. त्यात जनसुराज्यच्या भोसले व यादव यांनी सरूडकर गटाची सत्ता काढून घेतली. यावेळीही सत्ता कायम ठेवण्यासाठी भोसले, यादव यांनी मोर्चेबांधणी केली आहे. पाच वर्षांत केलेली विकासकामे ते जनतेसमोर घेऊन जात आहेत.

विरोधात शिवसेनेचे मारुती पाटील, तुकाराम पाटील, मधुकर पाटील, विलास पाटील यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. गतवेळी जनसुराज्यच्या साथीला असणारे भगवान पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांना काही जागा देत यावेळी शिवसेनेच्या गोटात सामील करून घेतले आहे. सत्ता आपल्याच गटाकडे ठेवण्यासाठी जनसुराज्यकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत, तर गेलेली सत्ता पुन्हा एकदा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या गटाने कंबर कसली आहे.
 

दृष्टिक्षेपात शिरगाव..

  •  एकूण मतदार : २३०६
  •  एकूण प्रभाग : ३
  •  एकूण जागा : ९
  •  सध्याचे बलाबल : 
  • जनसुराज्य : ९
  • शिवसेना : ०

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT