Elephant expert Anand Shinde interact with farmers of 50 elephant affected villages Chandgarh  sakal
कोल्हापूर

Anand Shinde : हत्ती-मानव समन्वयासाठी ‘एलिफंट अंकल’

आनंद शिंदे करणार मार्गदर्शन; चंदगड, आजऱ्यातील ५० गावांत साधणार संवाद

सुनील कोंडुसकर

चंदगड (जि. कोल्हापूर) : विशिष्ट स्थितीत हत्तींच्या वर्तणुकीवर त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधण्याची कसब असलेले, हत्ती अभ्यासक आनंद शिंदे चं(Elephant expert Anand Shinde) दगड व आजरा तालुक्यातील हत्ती बाधित ५० गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष कमी करून समन्वयाचे वातावरण कसे तयार करता येईल, यासंदर्भाने ते मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, हत्तींशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपाययोजना या अनुषंगाने ते शासनाला अहवाल सादर करणार आहेत. शिंदे यांनी केरळ येथे राहून हत्तींच्या वर्तनाचा अभ्यास केला आहे.

त्या आधारावर देशभरात अनेक ठिकाणी नियंत्रणाबाहेर गेलेल्या हत्तींशी विशिष्ट पद्धतीने संवाद साधून, त्यांच्याशी जवळीकता करून त्यांना कह्यात आणण्यात यश मिळवले. त्यामुळेच त्यांना एलिफंट अंकल असेही संबोधले जाते.

चंदगड व आजरा तालुक्यात हत्तींचा वावर सुरू होऊन दोन दशके होत आहेत. या कालावधीत इथल्या शेतकऱ्याने त्याला स्वीकारले असले तरी पिकांचे व अन्य मालमत्तेचे होणारे नुकसान पाहता अजूनही मनात तिरस्काराची भावना आहे.

ज्या भागात हत्तीचा सातत्याने वावर आहे तिथे तर त्याची तीव्रता अधिक आहे. मुळात हत्ती नियंत्रणाबाहेर का जातो, याचे काही ठोकताळे आहेत. त्याबाबत सर्वसामान्य माणूस जाणकार झाला, तर हत्तीच्या वर्तनात सुधारणा करण्याच्या दिशेने त्याची पावले पडू शकतात.

शिंदे यांच्याकडून याचेच मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर या दौऱ्यात शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या सूचना ते शासनापर्यंत पोहचवणार आहेत. राज्य शासनाने त्यांना अभ्यासासाठी चार महिन्यांसाठी नियुक्त केले आहे.

या गावांत साधणार संवाद

चंदगड तालुका : जांबरे, उमगाव, नागवे, सावतवाडी, न्हावेली, खळणेकरवाडी, हेरे, वाघोत्रे, खालसा गुडवळे, खामदळे, इसापूर, कानूर खुर्द, भोगोली, बिजूर, पिळणी, पाटणे, पार्ले, कळसगादे, नगरगाव, कलिवडे, किटवडे, शेवाळे, जेलुगडे, जंगमहट्टी, हाजगोळी, तुडीये, माडवळे, ढेकोळी, सुरुते.

आजरा तालुका : हाळोली, देवर्डे, मसोली, माद्याळ, मेढेवाडी, गवसे, सुळेरान, दर्डेवाडी, आल्याचीवाडी, घाटकरवाडी, किटवडे, शेळप, पोळगाव, इटे, खानापूर, मलिग्रे, बाची, सोहाळे, देऊळवाडी, आवंडी.

हत्ती हा आता या जंगलाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याला पिटाळून लावणे महाकठीण आहे. त्यातून संघर्ष आणि नुकसानच अधिक आहे. त्याऐवजी त्याच्याशी सुसंगत व्यवहार करणेच हिताचे आहे.

- आनंद शिंदे, हत्ती अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : नवीन वर्षाची सुरुवात हुडहुडीने ! महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

तरुणांनो तयारीला लागा, पोलिस भरतीची फेब्रुवारीपासून मैदानी! राज्यात एका पदासाठी ११३ उमेदवार; सोलापूर शहरात जागा ७९ अन्‌ अर्ज ४१५१; बँड्‌समनसाठी एक तृतीयपंथी

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिकासाठी आता बाह्य परीक्षकांमध्ये अदलाबदल; बोर्डाकडून पहिल्यांदाच मोठा बदल; शिक्षणाधिकाऱ्यांची पथके करणार पडताळणी

Panchang 31 December 2025: वर्षाच्या शेवटच्या दिवशी विष्णुसहस्रनामस्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

महाबळेश्वर हादरलं! कंटेनरमध्‍ये गुदमरून दोघांचा मृत्‍यू; मजुरांनी थंडी घालवण्यासठी शेगडी पेटवली अन् विपरीत घडलं..

SCROLL FOR NEXT