ganpati sakal
कोल्हापूर

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना साद

गावामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुन प्रदुर्षनमुक्तीच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.

अवधूत पाटील -सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या सहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविला जात आहे. ही लोकचळवळ अविरत सुरु ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना साद घातली आहे. आपल्या मतदारसंघातील गावामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुन प्रदुर्षनमुक्तीच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनतर्फे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २०१५ पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाचा उत्सवही पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी आपापल्या मतदारसंघातील गावात जनजागृती करावी. घरगुती व सार्वजनिक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, गणेशमूर्तीचे पर्यायी व्यवस्थेत विसर्जन करणे, निर्माल्य संकलन करण्याबाबत जनजागृती करावी.

पर्यावरणपूरक किंवा शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, पर्यायी व्यवस्थेची निर्मिती करावी. यातून प्रदुर्षणमूक्तीचा हेतू साध्य करण्यात यशस्वी होऊया असे आवाहन पत्रातून केले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या पत्रावर सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT